Crime sakal
पुणे

फसवणुक करुन पळालेल्या सोनाराला राजस्थानमधुन अटक

सोन्या-चांदीचे दुकान सुरु करुन काही वर्षानंतर नागरीकांची सुमारे 50 ते 70 लाखांची आर्थिक फसवणुक करुन फरारी झालेल्या सोनाराला त्याच्या मुलासह ताब्यात घेण्यात राजगड पोलिसांनी यश आले.

किरण भदे

सोन्या-चांदीचे दुकान सुरु करुन काही वर्षानंतर नागरीकांची सुमारे 50 ते 70 लाखांची आर्थिक फसवणुक करुन फरारी झालेल्या सोनाराला त्याच्या मुलासह ताब्यात घेण्यात राजगड पोलिसांनी यश आले.

नसरापूर - नसरापूर ता. भोर येथे सोन्या-चांदीचे दुकान सुरु करुन काही वर्षानंतर नागरीकांची सुमारे 50 ते 70 लाखांची आर्थिक फसवणुक करुन फरारी झालेल्या सोनाराला त्याच्या मुलासह राजस्थानमधील त्याच्या गावामधुन ताब्यात घेण्यात राजगड पोलिसांनी यश आले. असुन या मुळे सोनाराने अजुन काही सर्वसामान्य नागरीकांची केलेली फसवणुक देखिल उजेडात येणार आहे.

बाबुसिंग केशरसिंग चौहान व त्यांचा मुलगा शैलेश बाबुसिंग चौहान यांना राजगड पोलिस ठाण्याच्या पथकाने तवाव, ता. जसवंतपुर, जि. जालोर राजस्थान येथुन ताब्यात घेतले आहे.

नसरापूर येथे बनेश्वर ज्वेलर्स च्या नावाने बाबुसिंग चौहाऩ हा मुलगे मंगेश व शैलेश यांच्या समवेत सोन्या-चांदीचे दुकान सुरु करुन नविन सोने बनवण्यासाठी जुने सोने जमा करुन घेणे, तसेच सोने गहाण (तारण) ठेवुन अवैध सावकारी देखिल करत होता. यादरम्यान अनेक लोकांचे सोने घेऊन, रक्कम घेऊन मे महिन्यात नागरीकांची सुमारे 50 लाखांची फसवणुक करुन चौहान दोन्ही मुलांसह फरार झाला होता. याबाबत ज्योती दिपक शिंदे, रा. वेळु, ता. भोर यांनी तसेच नसरापूर परिसरातील गावामधुन फसवणुकीच्या सोळा तक्रारी राजगड पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

याबाबत तपास करताना राजगड पोलसांना चौहान त्याच्या राजस्थान मधील गावाला गेला असल्याचे समजले होते. राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय सुतनासे, हवालदार महेश खरात, पोलिस नाईक गणेश लडकत, शरद धेंडे यांच्या पथकाने राजस्थान येथे जाऊन मोबाईल लोकेशनव्दारे चौहान याचा तपास करत राजस्थानमधील जामोर जिल्ह्यातील जसवंतपुर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक दिनेश सिंग यांच्या मदतीने तवाव गावामध्ये जाऊन बाबुसिंग चौहान व त्यांचा मुलगा शैलेश चौहान या दोघांना ताब्यात घेतले तर दुसरा मुलगा मंगेस हा फरार आहे.

याबाबत पोलिस उपनिरीक्षक संजय सुतनासे यांनी माहीती देताना सांगितले कि, चौहान नसरापूर येथुन बेपत्ता झाल्यापासुन त्याच्या मोबाईल लोकेशनव्दारे तपास घेण्यात येत होता दरम्यान तो राजस्थान येथील गावात गेल्याचे समजल्यावर आमच्या पथकाने राजस्थान येथे जाऊन ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या तवाव गावात गेल्यावर चौहान यांच्या नातेवाईक महिलांनी त्यांना ताब्यात घेण्यास अटकाव केला. परंतु, तेथील पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले मुख्य आरोपी व मुलगा या दोघांना ताब्यात घेतले असुन, नसरापूर परिसर व भोर वेल्हे तालुक्यातील अनेक नागरीकांची त्यांच्याकडुन सुमारे 70 ते 80 लाख रुपयांची फसवणुक झाल्याची शक्यता आहे. त्याचा तपास त्यांच्याकडे करण्यात येणार असुन, अजुन काही नागरीकांची फसवणुक चौहान यांच्याकडुन झाली. असल्यास त्यांनी राजगड पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी असे अवाहन संजय सुतनासे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT