पुणे

गोंदवल्यात वाहतूक कोंडी

CD

गोंदवल्‍यात वाहतूक कोंडीचा त्रास

रविवारची सुटी अन्‌ पौर्णिमेमुळे दिवसभर वाहनांची वर्दळ

गोंदवले, ता. १ : रविवारची सुटी आणि त्यातच पौर्णिमा असल्याने श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच भाविकांसह वाहनांचा ओघ वाढला होता. वाढलेली वर्दळ दिवसभर सातारा- लातूर महामार्गावर मोठ्या वाहतूक समस्येला कारणीभूत ठरत होती.
सातारा- लातूर महामार्गालगतच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे समाधी मंदिर आहे. आज पौर्णिमेनिमित्त ‘श्रीं’च्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे मुख्य चौकात व रस्त्याच्या दुतर्फा वारंवार आणि तीव्र स्वरूपाची कोंडी निर्माण होत होती. या वाहतूक कोंडीमुळे भाविक, व्यावसायिक तसेच स्थानिक नागरिकांचे हाल झाले. काही ठिकाणी वाहनांच्या लांबलचक रांगा दोन ते तीन किलोमीटरपर्यंत पसरल्या होत्या. अनेक वेळा वाहतूक पूर्णपणे ठप्प होत होती. विशेषतः मंदिरालगतच्या रस्त्यापासून पुढे मुख्य अप्पा महाराज चौक हा कोंडीचा मुख्य केंद्रबिंदू ठरला. वाहनांची गर्दी इतकी होती, की भाविकांना रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले होते. विशेष म्हणजे वाहनकोंडी होऊ नये म्हणून गस्त घालणाऱ्या पोलिसांचे वाहन देखील कोंडीत अडकून पडले होते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेतील उणिवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
............................
वाहतूक उपाययोजना आवश्‍‍यक
वाढत्या गर्दीचा अंदाज प्रशासनाला असूनही पुरेशी वाहतूक योजना न आखल्याची चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत होती. स्थानिक पोलिसा वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होतच होती. भाविकांचा उत्साह कायम असला तरी वाहतूक कोंडीमुळे यात्रेकरूंना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे गोंदवले परिसरात अशा मोठ्या गर्दीच्या दिवशी अधिक सक्षम वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
-------------------------
छायाचित्र :......02560
गोंदवले बुद्रुक : रविवारच्या सुटीदिवशीच पौर्णिमा आल्याने मुख्य रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. त्‍यात अडकलेले पोलिसांचे वाहन. (फिरोज तांबोळी : सकाळ छायाचित्रसेवा)
..................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT