goon Bapu Nair arrested in Maratkar murder case pune 
पुणे

पुणे : मारटकर खून प्रकरणी कुख्यात गुंड बापू नायरला अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे :  शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणात काल सराईत गुन्हेगार बापू उर्फ कुमार प्रभाकर नायक (रा. इंदिरानगर) याला अटक केली असून सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या खूनप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यापुर्वी 10 जणांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गुन्ह्यात तपास करीत असताना गुन्ह्यात गुंड बापू नायर याचा सहभाग असल्याचे समोर आले. मारटकर यांचे खून करणारे आरोपी ससून रुग्णालयात बापू नायरला भेटण्यास गेल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार बापु नायरच्या टोळीचा सदस्य स्वप्नील मोढवे याला पोलिसांनी प्रथम अटक केली होती. 

बापू नायरवर कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई केली होती. तेव्हापासून या गुन्ह्यासाठी तो सध्या येरवडा कारागृहात होता. मात्र, दीपक मारटकर खुनाच्या घटनेपुर्वी तो दोन ते तीन दिवस आजारी असल्याने ससून रुग्णालयात आला होता. त्यावेळी आरोपींनी ससून रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याचे समोर आले होते. यावेळी दिपक मारटकर यांच्या खूनाचा कट रचण्यात आला होता. पोलिसांनी या गुन्ह्यात मोक्कानुसार 12 जणांवर कारवाई केली आहे. त्यात बापू नायरलाही अटक करण्यात आली आहे. 

आंबेगाव कचरा डेपोला आग लागली की लावली?

 बापू नायरच्या सूचनेनुसार हा दीपक मारटकर यांचा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी न्यायलयातून अटकेचे वॉरंट प्राप्त केले. त्यानंतर त्याला अटक करुन न्यायलयातून हजर करण्यात आले होते. न्यायालयाने पुढील तपासासाठी 7 दिवसाची पोलिस कोठडी मंजुर केली आहे. बापू नायरला ससून रुग्णालयात असताना ड्युटीवर शिवाजीनगर मुख्यालयात कोर्ट कंपनीत असणारे कर्मचारी होते.  पोलिस बंदोबस्त असताना नायरला आरोपी भेटले कसे, असा ठपका ठेवून 6 कर्मचऱ्यांना नुकतेच निलंबित करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT