पुणे

पोखरीच्या विद्यार्थ्यानी घेतला गोरखगड-शिडी घाट ट्रेकचा अनुभव

CD

फुलवडे, ता. २० ः आहुपे (ता. आंबेगाव) येथील घाटातून गोरखगड ते शिडी घाट (ता. मुरबाड, जि. ठाणे) हा दोन दिवसाचा धाडसी ट्रेक पोखरी (ता. आंबेगाव) येथील श्री पंढरीनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी (ता. १९) शिवजयंतीनिमित्त पूर्ण केला.
या मुलामुलींची धाडसी व साहसी वृत्ती वाढावी म्हणून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागाच्या वतीने ट्रेकचे आयोजन केले होते. प्रा. एकनाथ साबळे, प्रा. विठ्ठल कोळप, प्रा. विशाल बेंडारी, प्रा. प्रणिता सदावर्ते तसेच प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे, क्रीडा संचालक प्रा. भाऊसाहेब थोरात यांनी यामध्ये भूमिका बजावली. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी आहुपे घाटाच्या कोकणकड्यासह कडे-कपाऱ्यांच्या खडतर, दगड गोट्यांच्या उतरत्या वाटेने मार्गक्रमण केले. वाटेत शिदोरीच्या जेवणावर ताव मारून पुढे गोरखगडाच्या दिशेने मार्गक्रमण केले.
गोरखगडाचा कठीण असा कडा सर करीत विद्यार्थ्यांनी साहसी वृत्ती दाखवली. तसेच, गडावरील गुफा मंदिर, मच्छिंद्रगड, सिद्धगड, आहुपे घाटाचे उंच कडे, सूर्यास्त या दृश्यांचा आनंद घेतला. गोरखगडाची प्रदक्षिणा करीत सायंकाळी पायथ्याशी देहरी गावातील गोरखनाथाच्या आश्रमात भोजन उरकून तेथे त्यांनी मुक्काम केला.
दुसऱ्या दिवशी गोरखनाथ आश्रमात विद्यार्थ्यांनी श्रमदान करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला. त्यानंतर, खांडसमार्गे शिडी घाटाकडे मार्गक्रमण करीत घाटाचा चित्तथरारक अनुभव घेत परतीच्या प्रवासाला निघाले. या दोन दिवसाच्या ट्रेकमध्ये ५५ किलोमीटरची भटकंती सर्वांनी केली. या ट्रेकमध्ये १४ मुली व ९ मुले तसेच ६ प्राध्यापक अशा २९ जणांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT