पुणे

गौराईच्या नैवेद्यासाठी भाज्यांच्या खरेदीला वेग

CD

मार्केट यार्ड, ता. १७ : गणरायाच्या आगमनानंतर गुरुवारी घरोघरी गौराईचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गौराईच्या नैवेद्यासाठी लागणाऱ्या विविध भाज्यांच्या खरेदीला बाजारात वेग आला आहे. विशेषतः पालेभाज्यांना ग्राहकांकडून चांगली मागणी राहिली. मागणीच्या तुलनेत आवकही समाधानकारक असल्याने यंदा भाज्यांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गौराईच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. त्यामुळे गुरुवारी मार्केट यार्डासह शहर आणि उपनगरांतील भाजी मंडईंमध्ये पालेभाज्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. नैवेद्यासाठी प्रामुख्याने शेपू, मेथी, पालक, चुका, लाल माठ आणि राजगिरा या भाज्यांना पसंती मिळाली. काही कुटुंबांमध्ये भोपळा आणि पडवळ यांचाही नैवेद्यात समावेश केला जात असल्याचे व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.
गौराईपूजनात सोळा प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा असून, त्यामध्ये शेपूच्या भाजीला विशेष महत्त्व आहे. काही घरांमध्ये विविध भाज्यांसह चटण्या, कोशिंबीर, पापड, कुरडई आणि गोड पदार्थांचाही नैवेद्य केला जातो. गौराईच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लाडू, करंजी, चकली, शंकरपाळी आणि चिवडा अशा फराळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. सायंकाळी पुरणपोळी आणि पंचपक्वान्नांचा नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे.

गौराईच्या आगमनामुळे नैवेद्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची बाजारात चांगली आवक झाली आहे. खरेदीसाठी ग्राहकांचीही गर्दी आहे. मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक पुरेशी असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी आहेत. भाज्यांचे भाव आवाक्यात असल्याने ग्राहकांकडून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- राजेंद्र सूर्यवंशी, अडते, मार्केट यार्ड

किरकोळ बाजारातील भाज्यांचे भाव
भाजीभाव (रुपये)
शेपू : २५ ते ३०
मेथी : २५ ते ३०
पालक : २० ते २५
चुका : ३० ते ४०
चाकवत : २० ते ३०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT