सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ११ः संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर औपचारिकता पाळली नसल्याचे सांगत विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले आहे. हा प्रकार घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी दोन तृतीयांश बहुमताची जुळवाजुळव करण्याचे गृहमंत्र्यांचे षडयंत्र असल्याचा आणि विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला.
काँग्रेसचे माध्यम विभागाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वरील पोस्टद्वारे हा मुद्दा मांडताना सरकारला लक्ष्य केले. त्यांनी म्हटले, की संसदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्यानंतर औपचारिक स्थगितीचे अंतर २९ दिवसांवर पोहोचले असून, केंद्रातील मोदी सरकारने २०१५ मधील स्वतःचाच विक्रम मोडला आहे. २०१५ च्या पावसाळी अधिवेशनात हे अंतर २८ दिवसांचे होते. २०२६ मधील पावसाळी अधिवेशन संपल्यानंतरची औपचारिकता अद्याप पूर्ण झालेली नाही.
पावसाळी अधिवेशन स्थगितीच्या औपचारिकतेचे पालन न करता सरकारकडून विरोधकांवर मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप रमेश यांनी केला. संसद अधिवेशन सरकारला हवे तेव्हा आणि आवश्यक त्या उद्देशाने पुन्हा बोलावता येते. त्यामुळे हा कालावधी लांबवून निर्माण केलेले गूढ निरर्थक असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच मतदारसंघ फेररचनेच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी आणि व्यापक सहमती निर्माण करण्यासाठी सरकार सर्वपक्षीय बैठक का बोलावत नाही, असा सवालही यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.