पुणे

कॉम्रेड पानसरेंचे विचार समजून घेणे गरजेचे : डॉ. कदम

CD

BAR26B13060
बार्शी : कॉ. पानसरे यांच्या स्मृतिदिनाच्या व्याख्यानात बोलताना डॉ. कदम. यावेळी उपस्थित तानाजी ठोंबरे, घाडगे.
---
कॉम्रेड पानसरेंचे विचार
समजून घेणे गरजेचे
डॉ. महेंद्र कदम; बार्शीत व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
बार्शी शहर, ता. २४ : प्रस्थापितांना ठिकाणावर आणण्यासाठी विस्थापितांच्या अंतर्गत लढाया आपणच सोडविल्या पाहिजेत. सत्यासाठी व्यवस्थेपुढे शरण न जाणे हे मानवतेचे लक्षण आहे; परंतु सत्याची कास सोडता कामा नये. अन्यायाच्या विरोधातील भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे विचार समजून घ्यावे लागतील, असे प्रतिपादन व्याख्याते प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांनी केले.
शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती दिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सोलापूर जिल्हा कौन्सिल यांच्यावतीने येथील आयटक कामगार केंद्र येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. कदम बोलत होते. याप्रसंगी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस गणेश बकशेट्टी, जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे व कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे उपस्थित होते.
‘सारेच दीप कसे मंदावले आता’ या विषयाची मांडणी करताना प्राचार्य डॉ. कदम म्हणाले, मार्क्सवादाचे शास्त्र जातवर्ग अंताचे शास्त्र आहे, ते मजबूत होणे आवश्यक आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनकर्त्यांना मुंबईत सिद्धिविनायक मंदिराची दारे बंद होतात, हे अमानवतेचे लक्षण आहे, अशी टीकाही डॉ. कदम यांनी यावेळी केली.
कॉ. ठोंबरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. प्रास्ताविक प्रवीण मस्तूद यांनी केले. सूत्रसंचालन अनिरुद्ध नखाते यांनी केले. यावेळी विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT