Govindrao Talwalkar sakal
पुणे

गोविंदराव तळवलकर यांनी ज्यांच्यावर प्रहार केले ते अजूनही तळमळत आहेत ; कुलकर्णी

कोणताही आव न आणता शांतपणे लिहणारे संपादक म्हणजे गोविंदराव तळवलकर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘पोटतिडकीने लिहिणे, शब्दांचे औडंबर माजून लिहिणे आणि लोकांना समजावे म्हणून लिहिणे हे लिखाणाचे तीन भाग आहेत. मात्र हे करीत असताना कोणताही आव न आणता शांतपणे लिहणारे संपादक म्हणजे गोविंदराव तळवलकर. खोटेपणा किंवा सामाजाच्या विरुद्ध केलेले काम त्यांना आवडायचे नाहीत. त्यावेळी त्यांनी ज्यांच्यावर प्रकार केले ते अजूनही तळमळत आहेत,’’ असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. एस. के. कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. २१) व्यक्त केले.

ज्येष्ठ पत्रकार गोविंदराव तळवलकर यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त ‘साहित्य शिवार वार्षिक पुणे’ यांच्यावतीने ‘गोविंदराव तळवलकर यांचे अग्रलेख’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यात डॉ. कुलकर्णी बोलत होते. निवृत्त आयएएस आणि बडोदा येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ‘महाराष्ट्र टार्इम्स’चे मुख्य संपादक पराग करंदीकर, माजी महापौर अंकुश काकडे आणि ‘साहित्य शिवार’चे संपादक जयराम देसाई यावेळी उपस्थित होते.

तळवलकर यांच्याबरोबर झालेल्या ओळखीपासून त्यांच्या शेवटापर्यंतच्या आठवणी आणि त्यांचे लेखन याबाबतच्या आठवणींना यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी उजाळा दिला. डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘एखाद्या मुद्द्याचे विश्लेषण कसे करायचे हे तळवलकरांना चांगले माहिती होते. ज्यांना भारत, येथील व्यक्तिमत्त्व, कोणात काय कमतरता होती हे सर्व समजून घ्यायचे असेल तर त्यांनी गोविंदरावांचे अग्रलेख, मृत्युलेख आणि लेख चाळावे. दुसऱ्यांचा मोठेपणा त्यांनी निर्विवादपणे मांडला. केवळ साधना हाताशी असून चालत नाही कर्तृत्व देखील मोठे असावे लागते. ते गोविंदरावांकडे होते.’’ ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांच्याबरोबर काम करतानाचे अनुभव देखील यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी मांडले.

देशमुख म्हणाले, ‘‘१९७० पासून माझी गोविंदरावांच्या लेखणीशी मैत्री आहे. २००५ साली माझी त्यांच्याशी पहिली व शेवटची भेट झाली. मी खूप वाचतो हा माझा भ्रम त्यांना भेटून दूर झाला. उदारमतवादी, परखड शैली आणि नेमकं शीर्षक त्यांच्या लेखनात असायचे. गो हत्या बंद करण्यासाठी ते पेटून उठले होते. आजही आपण शेती सुधारणेस हात घालतो आणि आपली फसगत होते. त्यामागील आपली भूमिका तळवलकर यांनी अत्यंत योग्यपणे मांडली होती.’’ त्यांच्या भविष्यवादी लेखांची माहिती यावेळी देशमुख यांनी दिली. करंदीकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. देसाई यांनी प्रास्ताविक करीत कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. आभार काकडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक मार्गावर कंटेनर-ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, एकलहरे येथे वाहतूक कोंडी!

SCROLL FOR NEXT