पुणे

गोयल यांनी घेतली गोर यांची भेट

CD

गोयल यांनी घेतली गोर यांची भेट

अमेरिकेशी व्यापार कराराच्या पार्श्‍वभूमीवर चर्चा


सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २६ : भारत-अमेरिका व्यापार आणि आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या दिशेने महत्त्वाचा घटनाक्रम दिल्लीत आज घडला. वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी त्यांचे समकक्ष अमेरिकेचे वाणिज्य हॉवर्ड लुटनिक आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेतली. या बैठकीत दोन्ही देशांतील व्यापार संबंधांचा विस्तार, गुंतवणूक वाढविणे आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर सविस्तर चर्चा झाली.
या चर्चांबाबत समाजमाध्यमांवर माहिती देताना गोयल यांनी भारत-अमेरिका व्यापार व आर्थिक भागीदारी विस्तारासाठी चर्चा अत्यंत फलदायी ठरल्याचे नमूद केले. ‘‘ही भेट अशा वेळी झाली आहे, की दोन्ही देश द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक कायदेशीर मजकूर अंतिम करण्याच्या प्रक्रियेत आहेत. कराराचा मसुदा पूर्ण करण्यासाठी दोन्ही बाजूंचे मुख्य वाटाघाटी करणारे याच आठवड्यात वॉशिंग्टन येथे भेटणार होते; मात्र अमेरिकेतील घडामोडींमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली,’’ असे गोयल यांनी सांगितले.
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेले व्यापक आयात शुल्क बेकायदा ठरवले. १९७७ च्या आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक अधिकार कायद्याच्या आधारे हे शुल्क लादताना अधिकारांचा अतिरेक झाल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयानंतर अमेरिकेने २४ फेब्रुवारीपासून १५० दिवसांसाठी सर्व देशांवर १० टक्के आयात शुल्क लागू केले आहे. हे शुल्क १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली असली, तरी त्याबाबत अद्याप अधिकृत आदेश जारी झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर गोयल यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, अमेरिकेतील शुल्कविषयक धोरणावर अधिक स्पष्टता मिळताच भारत-अमेरिका व्यापार चर्चा पुन्हा सुरू केल्या जातील. ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिकेने भारतावर २५ टक्के परस्पर शुल्क लादले होते. त्यानंतर रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल आणखी २५ टक्के शुल्क आकारण्यात आल्याने भारतावरील एकूण शुल्क ५० टक्क्यांपर्यंत पोहोचले होते.

पहिला टप्पा लवकरच
याच महिन्याच्या सुरुवातीला भारत आणि अमेरिका यांच्यात अंतरिम व्यापार करारासाठी एक चौकट ठरवण्यात आली आहे. या चौकटीअंतर्गत अमेरिकेकडून शुल्क १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे मान्य करण्यात आले असून, या चौकटीला औपचारिक कायदेशीर दस्तऐवजाचे रूप देऊन द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा अंमलात आणण्याचा दोन्ही देशांचा मानस आहे.
दरम्यान, २०२१ ते २०२५ या कालावधीत अमेरिका ही वस्तू व्यापारात भारताची सर्वात मोठी भागीदार ठरली आहे. भारताच्या एकूण निर्यातीपैकी सुमारे १८ टक्के निर्यात अमेरिका करते, तर आयातीतील वाटा ६.२२ टक्के आहे. एकूण द्विपक्षीय व्यापारात अमेरिकेचा वाटा १०.७३ टक्के इतका आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापारात भारताची निर्यात ८६.५ अब्ज अमेरिकी डॉलर, तर आयात ४५.३ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी नोंदवली गेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Latest Marathi News Live Update: राज्यसभा उपसभापतीपदाची निवडणूक १७ एप्रिल २०२६ रोजी घेतली जाईल

Parli Vaijnath News : वाढत्या विजेच्या मागणीच्या काळात परळी वीज केंद्राचा राज्याला मोठा आधार; १२५ दिवसांत ५५५.३९ मिलीयन युनीट विजेची निर्मिती

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

SCROLL FOR NEXT