पुणे

लोकसहभागाच्या जलसंधारणातून उभारली जलक्रांती

CD

​सासवड, ता. २५ : लोकसहभाग आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून जलसंधारण, ग्रामीण विकास व जलव्यवस्थापनाचे कार्य अविरतपणे राबविणाऱ्या खळद (ता. पुरंदर) येथील ‘ग्रामगौरव प्रतिष्ठान’ने (पाणीपंचायत) आपली ५१ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली आहे. या पंचदशक पूर्तीच्या निमित्ताने संस्थेने पुरंदरसह सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जलसंधारणाची मोहीम राबवून तब्बल १२ कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण केला आहे.

​गेल्या पाच दशकांपासून ‘ग्रामगौरव प्रतिष्ठान’ ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम करत आहे. यावर्षी संस्थेने पुरंदर तालुक्यातील दौंडज, सुकलवाडी, कांबळवाडी, काळदरी, खळद, वाल्हे, पांगारे, बहिरवाडी, कोलाडवाडी तसेच सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी, मिरढे आणि रत्नागिरीतील दापोली या गावांमध्ये विशेष कामे हाती घेतली होती.
दरम्यान, जलसंधारणांच्या कामांमुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी गती मिळाली आहे.

या कामांना प्राधान्य
पाझर तलावांचे पुनरुज्जीवन करणे,
माती व सिमेंट नाले बांधातील गाळ काढणे आणि
पाटांची दुरुस्ती करणे यांसारख्या कामांचा समावेश आहे.
​संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत प्रशांत बोरावके, योगेश मगर, ऋषी बळीद, प्रशांत कुंभारकर, सागर भोंडे, भाग्यश्री कुंभारकर आणि सोनाली जगताप यांनी विशेष योगदान दिले आहे.

‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा केवळ एक संदेश नसून, ग्रामीण विकासाचा तो पाया आहे. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही लोकसहभाग आणि सीएसआर फंडाच्या बळावर जलसमृद्धीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करत आहोत.
- डॉ. सोनाली शिंदे, ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या ​कार्यकारी विश्वस्त


06993

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT