Chandrakant Patil Sakal
पुणे

Chandrakant Patil : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खेड तालुक्यातील १२७२ मतदार संख्या असलेल्या आदिवासी बहुल भागातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेल्या साकुर्डी गावात हजेरी लावली.

महेंद्र शिंदे

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खेड तालुक्यातील १२७२ मतदार संख्या असलेल्या आदिवासी बहुल भागातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेल्या साकुर्डी गावात हजेरी लावली.

कडूस - जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता.14) सायंकाळी खेड तालुक्यातील बाराशे बहात्तर मतदार संख्या असलेल्या आदिवासी बहुल भागातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असलेल्या साकुर्डी गावात हजेरी लावली. 'चांगल्या माणसांच्या आपण पाठीशी उभे राहायचे असते. यामुळे चांगल्या माणसांना निवडून द्या, हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे,' असे सुरुवातीलाच स्पष्ट करीत 'योग्य व चांगल्या उमेदवारांना निवडून द्या,' असे या वेळी जाहीर आवाहन त्यांनी केले.

खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या उशालगत दुर्गम भागातील १६७६ लोकसंख्या व १२७२ मतदार संख्या असलेल्या साकुर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तीन वॉर्डमधून नऊ सदस्य व लोकांमधून सरपंच निवडून देण्यासाठी रविवारी (ता.१८) मतदान होणार आहे. यासाठी एकासएक पद्धतीने दोन पॅनेलमध्ये निवडणुकीची सरळ लढत होत आहे. दोन पॅनेलमध्ये 'काटे की टक्कर' अनुभवायला मिळत आहे. प्रचार शिगेला पोचलेला असतानाच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी अचानक गावात हजेरी लावली. पालकमंत्र्यांनी नुसतीच हजेरी लावली नाही तर जाहीर जोरदार भाषण सुद्धा ठोकले. यामुळे एरव्ही पंचक्रोशीबाहेर चर्चेत नसलेली साकुर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक तालुक्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. पालकमंत्री पाटील म्हणाले, 'मी सगळ्यांना न्याय देणारा आहे.

राष्ट्रवादी, काँग्रेसवाले पण त्यात आहेत. पण जी योग्य व चांगली माणसे आहेत, ज्यांच्यासाठी मी प्रचारात फिरतो आहे, त्यांना विकास निधीमध्ये प्राधान्य देईन. ग्रामपंचायतीची निवडणूक पार्टीच्या चिन्हावर लढवली जात नाही, पण चांगल्या माणसांच्या पाठीशी उभे राहायचे आले. चांगल्या लोकांना निवडून द्या, एवढे सांगण्यासाठी मी इथे आलो आहे.' असे म्हणत पाटील यांनी आपल्या भाषणात गावात झालेल्या विविध कामांची यादीच वाचून दाखवली. सुमारे सोळा कोटींची कामे मार्गी लागल्याचे सांगत आणखी नवीन मागणी असलेल्या कामांची यादी वाचून 'मी ही कामे तुम्हाला दिली, असे मी म्हणणार नाही,' असे 'दिली' या शब्दावर जोर देत म्हणाले 'दिली म्हणालो तर निवडणूक काळात अमिश दिल्यासारखे होईल व आचारसंहितेचा भंग होईल. मला अडचणीत आणण्यासाठी लोक रोज कॅमेरा लावून बसून आहेत. यामुळे ही कामे दिली असे म्हणणार नाही, परंतु याचा सकारात्मक विचार करेन.'

पुढे पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जनधन योजना, गरिबांसाठी उज्वला गॅस योजना, गरिबांना मोफत घरे व शौचालय बांधून देण्याची योजना, दोन कोटी लोकांना मोफत वीज, बावीस हजार गावांमध्ये सुरू असलेल्या हर घर नल - घर घर जल उपक्रमांतर्गत पाणी योजना आदी लोकाभिमुख योजनांबद्दल भाषणात माहिती सांगितली. यावेळी माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, भगवान पोखरकर, अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, रामदास निर्मळ, अजय चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT