पुणे - ताजा भाजीपाला तोही पूर्णपणे सुरक्षित मिळत असल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी "ऍग्रोवन'च्या पुढाकाराने सुरू केलेल्या "सेवन मंत्रा' भाजीपाला-फळे थेट घरपोच देण्याच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजीपाला आणि फळांच्या बास्केटसाठी मागणीही वाढली आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
थेट शेतातून ग्राहकांच्या घरात भाजीपाला पोचविण्याचा उपक्रम 9 जूनपासून सुरू करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन हा भाजीपाला आणि फळे नागरिकांच्या घरात पोचवली जात आहेत. त्यास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आगाऊ बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना आठवड्यातून मंगळवार, गुरुवार आणि रविवारी सकाळीच खास बास्केटमध्ये भाजीपाला आणि फळे घरपोच दिली जातात. भाजीपाल्यामध्ये चार प्रकारच्या बास्केट असून, छोट्या कुटुंबापासून मोठ्या कुटुंबापर्यंत पुरतील अशा भाज्या व फळे या उपक्रमात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्राहकांकडून त्यासाठी www.sevenmantras.com या वेबसाइटवर आगाऊ नोंदणी करण्यात येते. त्यानंतर एका क्लिकवर ताजा, स्वच्छ आणि कमीत कमी हाताळणी केलेला माल घरपोच मिळतो.
पावसाळ्यात ताज्या आणि चांगल्या भाज्या उपलब्ध होत नाहीत; पण या उपक्रमात शेतकऱ्यांकडून माल उपलब्ध होत असल्याने कोणतीही अडचण येत नाही; तसेच भाजीपाला आणि फळांच्या दर्जाबाबतही सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळेच भाजीपाला आणि फळांना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.
पावसाळ्यात चांगल्या भाज्या मिळत नाहीत; पण या बास्केटमध्ये ताज्या, स्वच्छ आणि कोरड्या भाज्या असतात. त्यामुळे बाहेरून भाज्या आणण्याची कटकट मिटली आहे.
- सविता जाधव, सहकारनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.