पुणे

जीएसटी च्या निर्णयाचा दूध व्यवसायावर सकारात्मक परिणाम, गायीच्या दुधाची वाटचाल प्रति लिटर ४० रुपयांकडे ''

CD

गाय आणि दूध कँडचे संग्रहित छायाचित्र

गायीच्या दुधाची वाटचाल प्रति लिटर ४० रुपयांकडे

‘जीएसटी’च्या निर्णयाचा दूध व्यवसायावर सकारात्मक परिणाम

संदीप गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
उ. सोलापूर, ता. १६ : सहा महिन्यापूर्वी केंद्र सरकारने जीएसटीच्या कराची पुनर्रचना केली. यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांना दिलासा देणारा निर्णय जाहीर केला होता. याचे सध्या दूध व्यवसायावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गायीच्या दुधाच्या खरेदी दरात सुधारणा होत असून काही उद्योगांनी प्रति लिटर ३९ रुपये इतका दर जाहीर केला आहे. भविष्यात हे दर ४० रुपयांपेक्षा जास्त होण्याची आशा या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
तीन वर्ष सातत्याने तोट्यात असलेल्या दूध व्यवसायाला उत्पन्नाची आशा दिसत आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात जीएसटी कराची पुनर्रचना जाहीर केली. या पुनर्रचनेत दूध व दुग्धजन्य पदार्थांना भरीव सवलत देण्यात आली. आईस्क्रीम, दूध भुकटी, तूप यांच्यावरील असणारा १८ टक्के इतका मोठा कर कमी करत पाच टक्क्यांवर आणला. इतरही दुग्धजन्य पदार्थांना करातून सवलत देण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम सध्या दूध व्यवसायावर दिसून येत आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागली असून बाजारात दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढू लागली आहे. यामुळे राज्यासह परराज्यातील खासगी उद्योग दुग्धजन्य पदार्थाची खरेदी करत आहेत. आईस्क्रीम उद्योगाकडून दूध भुकटीची मागणी वाढली आहे. साहजिकच यामुळे दूध खरेदीमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. परिणामी गायीच्या दुधाच्या खरेदी दरात सुधारणा होत आहे. सध्या गायीच्या प्रमाणीत दुधाला काही दूध उद्योग ३८ रुपये तर काही दूध उद्योग ३९ प्रति लिटर इतका भाव देत आहेत.
दुधाच्या दरात सुधारणा होत असली तरी शेतकऱ्यांसाठी सद्यस्थितीला फारसे काही हातात राहत नाही. अतिवृष्टीमुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात चारा टंचाई झाली आहे, महापुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची वैरण वाहून गेली आहे. यामुळे चारा खरेदीवर शेतकऱ्यांचा फार मोठा खर्च होत आहे. तसेच पशुखाद्याच्या किमती गगनाला भिडत आहेत. मात्र अमेरिकेसोबत झालेल्या करारामुळे पशुखाद्यांच्या किमती कमी होण्याची आशा आहे. असे झाल्यास तोट्यात असलेला दूध उत्पादन व्यवसाय हा नफ्याकडे वाटचाल करू शकतो असे सांगण्यात येते.


कोट
केंद्र सरकारच्या जीएसटी कराच्या सवलतीचा परिणाम दूध व्यवसायावर सकारात्मक झालेला आहे. दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी या सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आहे. मात्र पिशवीबंद दुधाच्या विक्री करणाऱ्या उद्योगांनी अद्याप भाव वाढ केली नाही. पिशवी बंद दुधाच्या विक्रीत नफा कमवणाऱ्या घटकाला चाप बसवल्याशिवाय या व्यवसायातील अनिष्ट प्रथा बंद होणार नाही.
- प्रकाश कुतवळ, सचिव, महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 World Cup : हस्तांदोलन नाहीच! भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये दोन बदल; पाकिस्तानला टॉसच्या वेळीच दिला दम

Pune Bharat Taxi: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांसाठी भारत टॅक्सी सेवा सुरू; दर किती आणि कसे आकारणार?

IND vs PAK : जय शाह यांचा 'Dhurandhar' प्लान! पाकड्यांना त्यांची जागा दाखवण्याची सोडणार नाही संधी, सामन्यापूर्वीच होणार 'गेम'

नवरा असावा तर असा ! बायकोसाठी हार्दिकने पाहिलंय 'हे' स्वप्न; "तिने राणीसारखं मोठ्या गाडीत बसावं आणि मी.."

Latest Marathi News Live Update : पुण्यातील भाजप कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

SCROLL FOR NEXT