पुणे

पालकमंत्री महोत्सव बातमी

CD

पालकमंत्री महोत्सवानिमित्त विविध स्पर्धा
अहिल्यानगर, ता. ८ ः सांस्कृतिक मंत्रालय आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवानिमित्त शहरात चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी अर्ज व साहित्य घेण्याची व्यवस्था शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली आहे. ११ ते १५ मेदरम्यान स्पर्धकांनी फॉर्म संबंधित केंद्रांवरून घ्यावेत, तसेच २० ते २२ मे या कालावधीत पूर्ण केलेले चित्र किंवा निबंध पुन्हा त्याच केंद्रांवर जमा करावेत, असे आवाहन महोत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे.
चित्रकला स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेला घाट,’ ‘अहिल्यादेवी होळकर यांचे व्यक्तिचित्र आणि त्यांच्या जीवनातील प्रसंग’ हे विषय देण्यात आले आहेत. महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी ‘अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले शिवमंदिर, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या स्मारकाची कल्पना’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. निबंध स्पर्धेत शालेय गटासाठी ‘अहिल्यादेवी होळकरांचे जीवन - राष्ट्रीय एकात्मतेची यशोगाथा’ आणि अहिल्यादेवी होळकर - एक कुशल संघटक’ हे विषय देण्यात आले आहेत. खुल्या गटासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य’ आणि ‘त्यांचे जीवनचरित्र - महिला सबलीकरणाचे उदाहरण’ हे विषय निश्चित करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी पुष्कर कुलकर्णी, चंद्रकांत तागड, अशोक डोळसे, राधाकृष्ण जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

Pune Mega Plan : पुण्याचा २०३६ चा मेगा प्लॅन विकास आराखडा तयार : अर्थव्यवस्था २२० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट

Solapur Farmer Loan Waiver : 59 हजार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा; त्रुटी दूर, नवीन यादी लवकरच होणार जाहीर, आतापर्यंत 30 हजार 500 शेतकऱ्यांची नावे प्रसिद्ध

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Election Symbol Controversy : निवडणूक आयोग एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून काम करत असेल तर आता काय उरते?; हायकोर्टाचा सवाल

SCROLL FOR NEXT