ज्ञानसंवर्धिनी स्कूलमध्ये
स्काऊट गाइड शिबिर
खंडाळा, ता. २८ : शिरवळ (ता. खंडाळा) येथील ज्ञानसंवर्धिनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये एकदिवसीय स्काऊट गाइड शिबिर उत्साहात झाले. शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमेरिकन उद्योजक मिस्टर बॉब अल्टीस हे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, स्वावलंबन आणि सेवाभाव रुजविण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन शाळेच्या मैदानावर करण्यात आले होते. सनदी लेखापाल कृष्णा ढवळे, संचालक ईश्वर जोशी, स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती माने आणि मुख्याध्यापिका श्रीमती ढमाळ आदी उपस्थित होते.
यावेळी भारत स्काऊट प्रशिक्षण (भोर, जि. पुणे) लीडर ट्रेनर संजय खरमरे आणि लीडर ट्रेनर श्री. तामकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरात विद्यार्थ्यांना विनाभांड्याचा स्वयंपाक कसा करायचा, विविध प्रकारचे गाठींचे प्रकार आणि स्काऊट गाइड क्षेत्रातील विविध पुरस्कारांची माहिती या विषयांवर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
मिस्टर बॉब अल्टीस यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे आणि शिस्तीचे कौतुक केले.
या उपक्रमासाठी संस्थेचे. डॉ. जोगळेकर, रमेश देशपांडे, सर्व संचालकांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
------------------
शिरवळ ः परदेशी पाहुण्यांसोबत स्काऊट गाइडचे मागदर्शक शिक्षक, संस्थेचे संचालक व इतर.
-------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.