निकिता टकले sakal
पुणे

हडपसर : "टाइम अटॅक राष्ट्रीय कार रॅलीमध्ये' निकिता टकले प्रथम

वाघोली येथील महालक्ष्मी लॉनच्या मैदानावर ही स्पर्धा

कृष्णकांत कोबल

हडपसर : एच.डी.एफ.सी. बँकेच्या वतीने आयोजित केलेल्या "टाइम अटॅक राष्ट्रीय  कार रॅलीमध्ये' मांजरी बुद्रुक येथील कु. निकिता नितीन टकले हिने तीन वर्गात प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्पर्धेतील पदार्पणातच तीने आठ स्मृतिचिन्हे मिळवीत वयाच्या एकविसाव्या वर्षी घवघवीत यश संपादन केले आहे. वाघोली येथील महालक्ष्मी लॉनच्या मैदानावर ही स्पर्धा झाली.

निकिताने एकूण चौदा वर्गांपैकी दहा वर्गात सहभाग घेतला होता. त्यातील प्रो लेडीज, अमेचर लेडीज क्लास व एकूण स्पर्धेतील कामगिरीसाठी तीला प्रथम क्रमांक मिळाला. तर इतर आठ वर्गातील सहभागासह यशस्वी रायडींगसाठी तीला गौरविण्यात आले. निकीताच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

हैद्राबाद, बेंगलोर, चेन्नई, मुंबई, दिल्ली, नागपूर, पुणे, कोल्हापूर या भागातून १८५ कार रायडर या रॅलीत सहभागी झाले होते. वरून लाल, ध्रुव चंद्रशेखर, माझदयार वाछा, ख्याती मोदी, संजय लाल, प्रदीप नायर आदी दिग्गज रायडर्सने यामध्ये सहभाग घेतला होता. निकिताने पदार्पणातच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण राईडसने चमकदार यश मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. यानिमित्ताने राईडसच्या क्षेत्रात या महिला खेळाडूने आपले नाव अधोरेखित केले आहे.

डर्ट रेस रॅली प्रकारात प्रत्येकाला दोन राउंड दिले होते. अतिशय खडतर असा मार्ग असताना मिळालेल्या संधीचे सोने करत निकिताने तीन मिनिटे बावीस सेकंदात राऊंड पूर्ण केला. स्पर्धेचे आयोजक कारपटू चेतन शिवराम यांच्या हस्ते तीचा सन्मान करण्यात आला.

"भारतात दोन स्पर्धात भाग घेऊन मी यश मिळविले आहे. कारपटू संजय टकले, वडील नितीन टकले यांच्या प्रेरणेने व राहुल संचेती, प्रफुल संचेती यांचे मार्गदर्शन घेत पुढील काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार रेसमध्ये सहभागी होणार आहे. त्यामध्ये यश मिळवून भारताचा तिरंगा जगाच्या पातळीवर फडकावयाचा आहे,' अशी इच्छा निकिताने यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT