Hadapsar Rickshaw
Hadapsar Rickshaw sakal
पुणे

Hadapsar News : हडपसरमधील रस्त्यावर ऑटो रिक्षाचालकांची मनमानी; वाहतुकीला होतोय अडथळा

कृष्णकांत कोबल

हडपसर - परिसरातील ऑटो रिक्षाचालकांना वळण लावण्यात वाहतूक पोलिसांना आजूनही यश मिळाले नाही. यामुळे रिक्षा थांब्यांसह ठिकठिकाणी एकाआड एक थेट रस्त्यावर त्या उभ्या राहून वाहतूक कोंडी करीत आहेत. विशेषतः मंत्री मार्केट कॉर्नरजवळील ससाणेनगर रस्त्यावर ऑटोचालकांची मनमानी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे इतर वाहतुकीला अडथळा होण्याबरोबरच पादचाऱ्यांचीही कोंडी होत आहे.

हडपसर उपनगरात रिक्षा व्यवसायाला मोठा वाव असल्याने त्यांच्या संख्या वाढीबरोबरच चालकांचा बेशिस्तपणाही वाढला आहे. मनमानीने बनविलेले अनाधिकृत थांबे, त्याठिकाणी इतर वाहन थांबल्यास होणारी दमदाटी, प्रवाशांना घेण्यासाठी अचानक भर रस्त्यावर रिक्षा थांबवणे, चौकात जीथे मोकळी जागा भेटेल तीथे अतिक्रमण करून उभे राहणे, शेअरच्या नावाखाली नियमांपेक्षा अधिक प्रवासी भरून मनमानी पद्धतीने भाडे आकारणे, वेगाने वाहन चालवणे आदी बाबी वारंवार निदर्शनास येत आहेत.

सध्या मंत्रीमार्केट, गांधीचौक, मगरपट्टा रस्ता, रविदर्शन, पंधरानंबर, गाडीतळ बसथांब्याच्या चारही बांजूंसह थेट बसथांब्यावरही रिक्षा मनमानी पध्दतीने उभ्या राहत आहेत. ससाणेनगर, हांडेवाडी, महंमदवाडीकडे जाणाऱ्या रिक्षा प्रवासी घेण्यासाठी मंत्रीमार्केट जवळील संपूर्ण रस्ता व्यापून टाकत आहेत. दुसऱ्या वाहनांना अडथळा होऊन सोलापूर मुख्य मार्गावर त्यामुळे वारंवार कोंडी होत असते.

अशा बेशिस्त रिक्षा वाहतुकीमुळे हडपसरवासीय त्रस्त झाले आहेत. या बेशिस्त रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला दिसत नाही. वाहतूक पोलिस एकीकडे अनाधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर प्रामाणिकपणे व नियमित कारवाई करताना दिसतात. त्याचवेळी थेट रस्ता आडवून उभ्या राहणाऱ्या रिक्षांवर मात्र मेहरनजर ठेवतात. त्यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या बाबत शंकेबरोबरच संतापही व्यक्त केला जात आहे.

'रिक्षाचालकांनी केलेल्या अनाधिकृत थांब्यांचा शोध घेऊन ते बंद केले जातील. वाहतुकीला अडथळा करणाऱ्या व मनमानी करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई केली जाईल. याशिवाय दररोजही ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे.'

- अर्जुन बोत्रे, वाहतूक पोलिस निरीक्षक, हडपसर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT