पुणे

अनधिकृत बांधकामांवर हातोडा

सकाळवृत्तसेवा

पुणे/वाघोली - नरे दत्तवाडी (ता. मुळशी) व वाघोली (ता. हवेली) या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मंगळवारी कारवाई करण्यात आली.

पीएमआरडीएने संबंधित बांधकाम मालकांना दोनदा नोटिसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरू ठेवली होती. गेल्या ३ एप्रिल रोजी बांधकाम निष्कासन कारवाई प्रस्तावित केली होती. मात्र बांधकाम करणाऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पीएमआरडीएकडे असलेल्या ठोस 

कागदपत्रांच्या आधारे उच्च न्यायालयाने संबंधित अर्जदाराचा अर्ज नुकताच फेटाळून लावला. त्यानंतर पीएमआरडीएने अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे.

लोहगाव रस्ता परिसरात सर्व्हे नंबर १४२७ मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईत करण्यात आली. पीएमआरडीचे तहसीलदार राजेंद्र मेदनकर, पोलिस निरीक्षक राजकुमार शेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सूर्यकांत कापसे, सहायक अभियंता राजेश्‍वर मंडगे, कनिष्ठ अभियंता भानुदास शिंदे, योगेश दिघे, सूरज पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.

‘पीएमआरडीए क्षेत्रातील अनधिकृत बांधकामधारकांना एमआरटीपी कायद्यांतर्गत नोटिसा दिलेल्या आहेत. तसेच अनधिकृत बांधकामधारकांची यादी पीएमआरडीएने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. अनधिकृत सदनिका या स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविण्यात येत असून, त्यामुळे त्यांची फसवणूक होते. त्यामुळे नागरिकांनी अनधिकृत सदनिका व गाळे खरेदी करू नयेत.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT