पुणे

लोंबकळत्या केबलमुळे कस्पटे चौकात अपघाताचा धोका

CD

पिंपळे सौदागर, ता.१० ः पिंपळे निलखकडून वाकडकडे जाणाऱ्या कस्पटे चौक परिसरात पुलाच्या बाजूला असलेल्या विद्युत खांबावरील केबल तुटून रस्त्याच्या मधोमध लोंबकळत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. दुचाकीस्वारांसाठी ही केबल जणू ‘गळ्याचा फास’ ठरू शकते, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
कस्पटे चौक हा वाकड, जगताप डेअरी, पिंपळे सौदागर तसेच हिंजवडी या भागांना जोडणारा महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू मानला जातो. सकाळ व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी या चौकातून मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. अशा गजबजलेल्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खाली लटकलेली केबल ही अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, विद्युत विभागाच्या खांबावरून टाकलेली ही खासगी केबल असून ती तुटल्यामुळे थेट रस्त्यावर लोंबकळत राहिली आहे. रात्रीच्यावेळी किंवा वाहतुकीच्या गर्दीत ही वायर लक्षात न आल्यास दुचाकीस्वाराच्या गळ्यात अडकून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे.

कस्पटे चौकातील विद्युत विभागाच्या खांबावरील लटकणारी केबल तातडीने पाहणी करून संबंधित पुरवठादार शोधून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- सचिन नांगरे, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

PMG26B03197

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT