पुणे

ज्येष्ठांचा छळ हा ‘सायलेंट क्राइम’

CD

पुणे, ता. १५ ः ‘‘अलीकडच्या काळात कौटुंबिक स्तरावर ज्येष्ठांच्या छळाच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत. हे दुःखद असले तरी दाहक वास्तव आहे. मात्र ज्येष्ठांचा कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावरील छळ हा कायद्याच्या चौकटीत सायलेंट क्राइम या वर्गवारीत येत असतो,’’ असे मत पुण्याचे माजी पोलिस आयुक्त जयंत उमराणीकर यांनी शुक्रवारी (ता. १४) एका जाहीर कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जनजागृती दिनानिमित्त जनसेवा फाउंडेशन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, आयएलसीआय, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम), मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघ (अॅस्कॉप), भारतीय योग संस्थान, नवचैतन्य हास्य योग परिवार आणि विविध ज्येष्ठ नागरिक संघांच्या संयुक्त विद्यमाने काल निवारा वृद्धाश्रमाच्या सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. या वेळी सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त मलिकार्जुन हरसुरे, निरीक्षक महेश घेवारे, जनसेवा फाउंडेशनचे विश्वस्त प्रा. जे. पी. देसाई, फेस्कॉमचे अध्यक्ष अरुण रोडे, अॅस्कॉपचे अध्यक्ष दिलीप पवार, लेकटाउन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य एस. आर. पाटील, कायदेतज्ज्ञ अॅड. बी. टी. निसळ, एकता योग ट्रस्टचे अध्यक्ष नाना निवंगुणे आणि चैतन्य हास्ययोग परिवाराचे अध्यक्ष विठ्ठलराव काटे आदी उपस्थित होते. या वेळी अॅड. बी. टी. निसळ लिखित ‘ज्येष्ठांचे प्रश्न आणि सरकारी अनास्था''’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
जनसेवा फाउंडेशनचे विश्वस्त प्रा. जे. पी. देसाई यांनी प्रास्ताविक केले. फाउंडेशनचे कार्यकारिणी सदस्य मोहन खटावकर यांनी सूत्रसंचालन केले. लेकटाउन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्राचार्य एस. आर. पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress vs BJP Political Clash : 'दिवा विझण्याआधी फडफडतो तशी भाजपची सध्याची अवस्था, शेवट जवळ आलाय'; डीके शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

प्रेमानंद महाराजांना भेटल्यास ढसाढसा रडली पूनम पांडे, नेटकरी म्हणाले...'आधी सगळं करुन बसली आणि आता..'

Latest Marathi News Live Update : राष्ट्रपती मुर्मूंनी घेतलं गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन

Viral Video: ‘संस्कार’ म्हणजे काय ते दाखवलं! वडिलांचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक

SCROLL FOR NEXT