हर्षवर्धन पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात करणार प्रवेश  sakal
पुणे

हर्षवर्धन पाटील यांची भाजपला सोडचिठ्ठी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात करणार प्रवेश

राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री तसेच राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करणार

संतोष आटोळे

इंदापूर : राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री तसेच राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्या प्रवेशाची तारीख आणि ठिकाण जाहीर करतील अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, गेली दोन महिने तालुक्याच्या विविध भागाचा दौरा केला यामध्ये कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की काहीही झाले तरी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे.

यावरून गेल्या 4 दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर बैठक झाली. यावेळी इंदापूरचे जागा महायुती मधील घटक पक्षाला असल्याने आपल्यासाठी दुसरा काहीतरी मार्ग काढू असे फडणवीस यांनी सांगितले.मात्र तो मार्ग माझ्या वैयक्तिक स्वार्थाचा ठरला असता.म्हणून मी त्यास नकार दिला.

त्यानंतर गुरुवार (ता.03) रोजी शरद पवार यांचेबरोबर बैठक झाली.यावेळी खा.सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. तसेच जयंत पाटील यांचीही त्यावेळी भ्रमणध्वनी वरून चर्चा झाली त्यानुरूप शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी तुम्ही आमच्या पक्षात यावे असा आग्रह धरला त्यानुरूप सर्वांशी केलेल्या चर्चेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात जाण्याचा निर्णय घेत आहे.

तसेच हा निर्णय घेत असताना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे-पाटील यांनाही याबाबत कल्पना दिली आहे.यामध्ये भूमिका घेत गेल्या दहा वर्षात इंदापूर तालुक्यातील जनतेवर झालेला अन्याय व त्यामधून झालेला उद्रेक यावर कार्यकर्त्यांनी केलेला आग्रह यामुळे पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून ही भूमिका व्यक्तिगत नसून ती जनतेच्या मागणीवरून व हिताचीसाठी घेतल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, विलास वाघमोडे, लालासाहेब पवार, देवराज जाधव, शरद जामदार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्षात हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश करण्याची घोषणा केल्याने प्रवेशाला विरोध करणारे प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे भरत शहा हे कोणती भूमिका घेतात याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या असून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT