पुणे

वैशाखातील उन्हाचा चटका आणखी वाढणार 

सकाळवृत्तसेवा

पुणे  - पुण्यात वैशाखातील उन्हाचा चटका येत्या रविवारपर्यंत (ता. 19) आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. पुण्यात मंगळवारी 39.2 नोंदल्या गेलेल्या कमाल तापमानाचा पारा पुढील चार ते पाच दिवसांत 41 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात आली आहे. 

वैशाखातील उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून, त्यामुळे लाहीलाही होऊ लागली आहे. कमाल तापमानाचा पारा वाढत आहे. राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आहे. त्याचवेळी मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे आहे. त्याचा परिणाम पुणे शहर आणि परिसरावर होत आहे. त्यामुळे या भागातील तापमान वाढत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. 

परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्याचा परिणाम हवामानावर होत आहे. पूर्व विदर्भात उष्णतेची लाट कायम असल्याने उन्हाचा चटका सकाळपासून वाढत आहे. त्यामुळे कमाल तापमानात चांगलीच वाढ होत आहे. मराठवाड्यातही तापमान वाढलेले आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणात तापमान सरासरीच्या दरम्यान आहे. सध्या हवामान कोरडे असल्याने वातावरणातील हवा गरम होत आहे. त्यामुळे उष्णतेत वाढ होत आहे. येत्या शनिवारपर्यत (ता. 18) विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्‍यता आहे. 

तेलगंण ते कोमोरिन परिसर, रायलसीमा आणि तमिळनाडूमध्ये समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. तमिळनाडूमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्याच्या परिसरात असलेले बाष्प ओढून घेतले असून, तापमानात वाढ झाली आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, अकोला, यवतमाळ येथे तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यात 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. खानदेशात उन्हाचा चटका कायम आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणात उन्हाचा पारा सरासरीएवढा आहे. त्यामुळे उन्हाचा झळा काही प्रमाणात कमी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT