Commissioner Vikramkumar Sakal
पुणे

Pune Rain : कोथरूड, सिंहगड रस्त्यावर पावसाचा धुमाकूळ; विसर्जन मिरवणूक सोडून आयुक्त घटनास्थळी दाखल

मुसळधार पावसामुळे कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी, वारजे, माळवाडी, सूस, बावधन यासह इतर भागात दाणादाण उडाली.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - पुण्यात आज उत्साहामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना सायंकाळच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोथरूड, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, धायरी, वारजे, माळवाडी, सूस, बावधन यासह इतर भागात दाणादाण उडाली. कोथरूड येथे प्रतिज्ञा मंगल कार्यालय या भागात अनेक सोसायट्या, बंगल्यांच्या आवारात पाणी घुसले. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने गोंधळ उडाला.

आयुक्त विक्रमकुमार हे टिळक चौकात मानाच्या गणपतीचे स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. मात्र, या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तेथून काढता पाय घेत थेट अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घ्यावी लागली.

आज दुपारी चार नंतर शहरात पावसाला सुरुवात झाली. कात्रज, आंबेगाव, धायरी, नर्हे, खडकवासला, वारजे, माळवाडी, कर्वेनगर, कोथरूड, सुस, बावधन या भागात प्रचंड मोठा पाऊस झाला. अवघ्या काही मिनिटातच रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले. सिंहगड रस्त्यावर वडगाव पूल, पाटील हॉस्पिटल, इनामदार चौक येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली.

अनेक नागरिकांच्या गाड्या बंद पडल्या. पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने सिंहगड रस्त्यावर धोकादायक स्थिती निर्माण झालेली होती. सुदैवाने पावसाचा जोर कमी झाल्याने आणि क्षेत्रीय कार्यालयामार्फत चेंबर मधील कचरा बाहेर काढण्याचे काम सुरू केल्याने पाण्याचा निचरा झाला.

अशी स्थिती सुस बावधन मध्ये देखील निर्माण झाली होती. या भागात निर्माण झालेल्या पूरस्थितीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

महापालिका आयुक्त विक्रमकुमार हे मानाच्या गणपतीचे स्वागत करण्यासाठी टिळक चौकात महापालिकेच्या मांडवामध्ये उपस्थित होते. त्यांनी ग्रामदैवत कसबा गणपती, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम या तीन मानाच्या गणपतीचे स्वागत केले. त्यानंतर आयुक्त विक्रम कुमार हे तातडीने तिथून बाहेर पडले.

कोथरूडमध्ये प्रतिज्ञा मंगल कार्यालयाच्या परिसरातील अनेक बंगल्यांमध्ये दुकानांमध्ये सोसायटीमध्ये पाणी घुसल्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील दूरध्वनीद्वारे तातडीने मदत कार्य करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. आयुक्त स्वतः कोथरूडमध्ये जाऊन प्रसिद्धी सर्व पाहणी केली व प्रशासनाला वेगाने काम करण्यासाठी कामाला लावले. रात्री साडेआठच्या सुमारास या भागातील स्थिती नियंत्रणात आली.

आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, 'मुसळधार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात पाणी जमा झालेले आहे. कोथरूड येथील घटनेची माहिती मिळताच येथे येऊन पाहणी केली आहे. यंत्रणा काम करत असून सर्व स्थिती नियंत्रणात आलेली आहे. पाण्याचा निचरा वेगाने होण्यास सुरुवात झालेली आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.'

भाजपचे प्रवक्ते संदीप खेर्डेकर म्हणाले, "प्रतिज्ञा मंगल कार्यालय, कर्वेनगर या भागात पाणी तुंबले. दुकाने, बंगले, सोसायट्यांच्या मध्ये पाणी शिरले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला त्वरित पाणी निसरा करण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले. आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त रवींद्र बिनवडे हे घटनास्थळी दाखल झाले असून महापालिकेची यंत्रणा काम करत आहे.

चेंबरच्या सफाईकडे दुर्लक्ष; 'सकाळ'ने वेधले होते लक्ष

महापालिका प्रशासनाने पावसाळ्यात देखील पावसाळी गटार व त्यांच्या चेंबरची स्वच्छता केली जाईल कचरा बाहेर काढला जाईल असे सांगितले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या संदर्भात 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित करत चेंबर स्वच्छ न झाल्यास आगामी काळात पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण होऊ शकते असे वृत्त प्रकाशित केलेले होते. महापालिका आयुक्ताने देखील त्यावेळी चेंबर सफाई करण्याचे आदेश दिले जातील असे सांगितले होते.

त्यानंतरही शहरातील पावसाळी गटारांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आले. गेल्या चार-पाच दिवसापासून शहरात मुसळधार पाऊस पडत असताना वारंवार पाणी तुंबत आहे. तरीदेखील प्रशासनाकडून चेंबर सफाईकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे या निमित्ताने समोर आलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

SCROLL FOR NEXT