पुणे

agnWeather-forecast-June- 26_txt.txt

CD

कोकण, मध्य महाराष्ट्रात
जोरदार पावसाचा अंदाज
---
पुणे : मॉन्सूनने राज्य व्यापल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आहे. आज (ता. २७) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे देशातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हंगामी कमी दाबाचा पट्टा उत्तर राजस्थानपासून ओडिशा पर्यंत सक्रिय आहे. गुजरात आणि सौराष्ट्र परिसरावर तसेच मध्य प्रदेश आणि परिसरावर ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ईशान्य बंगालच्या उपसागरात म्यानमारच्या किनाऱ्याजवळ ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आंध्र प्रदेश प्रदेशपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे.
शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मॉन्सूनच्या ढगांची छाया, पावसाची हजेरी यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. यातच उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी राज्याचा कमाल तापमानाचा ३६ अंशांच्याखाली घसरला आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज (ता. २७) रायगड, रत्नागिरी, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मेघगर्जना विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

शुक्रवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
‎---
‎ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमान
‎पुणे---३१.८---२२.९
अहिल्यानगर---निरंक---२३.३
धुळे---३२.०---२०.६
जळगाव---३४.१---निरंक
जेऊर---३३.५---१८.५
‎‎कोल्हापूर---२९.६--२२.८
‎महाबळेश्वर---२१.३---१७.६
मालेगाव---३६.०---२३.६
‎‎नाशिक---३२.१---२३.७
निफाड---३४.०---२३.५
‎सांगली---३२.०---२२.४
सातारा---३१.७---२२.१
‎सोलापूर---३४.३---२४.४
‎सांताक्रूझ---३२.२---२५.८
डहाणू---३५.०---२४.०
रत्नागिरी---२९.५---२३.८
छत्रपती संभाजीनगर---३२.१---२३.६
धाराशिव---३५.१---२०.०
परभणी---३०.६---२३.५
परभणी (कृषी)---३०.३---२२.१
अकोला---३२.९---२५.८
अमरावती---३३.४---२१.७
भंडारा---३६.०---२५.०
बुलडाणा---३०.७---२४.२
ब्रह्मपूरी---३८.२---२५.१
चंद्रपूर---३२.६---२६.४
‎गडचिरोली---३३.६---२३.४
‎गोंदिया---३६.६---२४.५
‎नागपूर---३५.२---२४.४
‎वर्धा---३५.०---२३.६
‎वाशीम---३२.६---२२.४
‎यवतमाळ---३४.०---१८.८
‎----
--चौकट--
‎सरासरी तापमान (अंश से.)
‎विभाग---किमान---कमाल
‎उत्तर महाराष्ट्र---२०.६---३६.०
‎पश्‍चिम महाराष्ट्र---१७.६---३४.३
मराठवाडा---२०.०---३५.१
‎विदर्भ---१८.८---३६.६
‎कोकण---२३.८---३५.०
---
फोटो आहे. (agnDistrict rain forecast)
शनिवारी (ता. २७) राज्यातील पावसाचा अंदाज दर्शविणारा नकाशा. (स्रोत : हवामान विभाग)

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
रायगड, रत्नागिरी, पुणे, अहिल्यानगर.

विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्वल निकमांची एंट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Loan EMI Tips: कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा! नवीन लोन घेताना 'या' 10 चुका अजिबात करू नका

Women Health: महिलांना चाळीशीनंतर सतत लघवीला का जावं लागतं? डॉक्टरांनी सांगितली त्यामागची खरी कारणं

Latest Marathi News Live Update : प्रियांका गांधींनी कुंभार समाजाच्या समस्यांबाबत आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले

Raigad Entrepreneurs Honoured: रायगडचा मान उंचावला; ‘नेक्स्टजेन डिजिटल’चे श्रीकांत जाधव व ‘अलोरवेदा’च्या पूजा खेडेकर यांना राष्ट्रीय ‘एमएसएमई स्टार पुरस्कार २०२६’

SCROLL FOR NEXT