लोणी काळभोर : लग्न म्हणजे नवरा-नवरीच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण. लग्नात आईवडील, जवळचे लांबचे नातेवाईक व नवरा-नवरीकडील मित्र मंडळी जास्तीत जास्त हजर रहावेत व लग्नाची शोभा वाढवावी अशी प्रत्येक नवऱ्या मुलाची व नवरी मुलीची मनोमनी असणारी अपेक्षा असते. मात्र लोणी काळभोर हद्दीतील पांडवदंड परीसरात रविवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पार पडलेले लग्न वरील रुढी परपंराना अपवाद ठरले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रमंडळी असो वा पै पाहुणे... अथवा जवळचे नातेवाई.. कोणीही लग्नाला येऊ नका.. असाल तिथुनच आर्शिवाद द्या... आर्शिवाद देतांना आहेर द्यायला मात्र विसरु नका... तोही वस्तुंच्या स्वरुपात नको तर रोख अथवा बॅंक खात्यात जमा करा.. हादरलात ना.. हो वरील खरे आहे. असे आगळे वेगळे लग्न रविवारी दुपारी दिड वाजनेच्या सुमारास लोणी काळभोर हद्दीतील पांडवदंड येथे पार पडले आहे.
संकेत मारुती काळभोर (लोणी काळभोर) व प्रियांका बाळासाहेब भाडळे (काळेपडळ, हडपरसर) ही आगळे-वेगळे लग्न करणाऱ्या अवलियांची नावे आहेत. वरील दोघांच्या मित्रमंडळी व नातेवाईकांनी जमा केलेली आहेराची रक्कम ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेले अनेक वर्षे भारतीय समाजात सुरु असलेल्या प्रथा, परंपरा, रुढी अशा सगळ्याच गोष्टी मोडीत निघाल्या आहेत. करोनाचे आगमन झाले. आणि मग लग्न करण्याची संकल्पनाच बदलली. हजारो लोकांच्या जेवणावळी, बुफे पद्धत, ताटात भरपूर पदार्थ, हजारो लोकांच्या उपस्थितीत लग्न हि पद्धतच करोनाने बदलून टाकली. फक्त दहा वीस लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्याची पद्धत गेल्या दोन महिन्यांपासून सुरु झाली आहे. मात्र टेक्नोसेव्ही असलेल्या आजच्या युवा पिढीने यावरही मार्ग शोधला आहे.
टेक्नोसेव्ही तरुण पिढीचा प्रतिनिधी असलेल्या लोणी काळभोर येथील संकेत काळभोर यांचे वडील मारुती काळभोर पानाची टपरी चालवतात. तर संकेत लोणी स्टेशन येथील मोबाईल विक्रीच्या दुकानात कामाला आहे. संकेतचे लग्न प्रियांका भाडळे हिच्याशी रविवारी दुपारी घराच्या अंगणात झाले. संकेतने पैपाहुणे व मित्रांनाही लग्नाला हजर असल्याचा आनंद मिळावा यासाठी, हा लग्न सोहळा फेसबुक व इन्स्टाग्राम वरुन लाईव्ह प्रक्षेपण केले. तसेच लग्नात आहेर देण्याऐवजी मुख्यमंत्री निधीसाठी किंवा पंतप्रधान निधीसाठी आर्थिक मदत करावी. व मदत केल्याची ती पावती व्हाॅटस अपवर नवरदेवाला पाठवावी. ते शक्य न झाल्यास एखाद्या गरीब कुटुंबांला अन्नधान्याची मदत करावी असे आवाहन संकेत काळभोर व नवरी मुलगी प्रियांकाने आपल्या मित्रमंडळींनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन केले होते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, या आवाहनाला पैपाहुणे व मित्र मंडळींनी प्रतीसाद देत लग्नांनतर तासाभरात संकेतच्या बॅंक खात्यात सात हजार सहाशे रुपये जमा केले. यात स्वतःच्या पैशाची भर घालून सोमवारी दहा हजाराचा धनादेश लोणी काळभोर येथील गाव कामगार तलाठी यांच्याकडे जमा करणार असल्याचे संकेतने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.