Online-Study 
पुणे

भारतीय तंत्रशिक्षण परिषदेची विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन सुरू

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हेल्पलाईन सुरू केली आहे. अभ्यास असो की वैद्यकीय सल्ला हे सर्व या हेल्पलाईनद्वारे मिळणार आहे.

महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान कसे टाळता येईल याबाबत शिक्षणक्षेत्र चिंतेत आहेच; परंतु वेगवेगळे प्रयोगही केले जात आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्यास सुरवात झालेली आहे. यात तंत्रशिक्षण विभाग मागे नाही. एक पाऊल पुढे टाकत तंत्रशिक्षण परिषदेने विद्यार्थ्यांसाठी सुलभ अशी हेल्पलाईन सुरू केली आहे. ही हेल्पलाईन म्हणजे पोर्टल आहे. एखादा विद्यार्थी मदत मिळवण्यासाठी या पोर्टलवर गेला की सुरवातीला त्याला त्याचे शहर विचारले जाते. त्यानंतर कोणती मदत हवी, असा प्रश्न दिसतो. त्याखाली विविध बाबींची यादी दिसते.

त्यावर क्‍लिक केल्यावर तुम्हाला हवी ती मदत मिळण्याचे मार्ग खुले होतात. ऑनलाईन वर्ग, शिष्यवृत्ती, लायब्ररी, पुस्तके, समुपदेशन, राहण्याची सुविधा, आरोग्य, औषधे, इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी आणि प्रवासविषयक सुविधांबाबत ही यादी आहे. तुम्ही आवश्‍यक मदतीच्या टॅबवर क्‍लिक केल्यास समोर संबंधित व्यक्तीच्या नावासह मोबाईल नंबर दिसतात. त्या मोबाईल क्रमांकावर फोन करून विद्यार्थी मदत मिळवू शकतो. https://helpline.aicte-india.org  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ही मदत मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

Why Grape Farmers Face Losses? द्राक्षबागेत पीकच न आल्याने शेतकऱ्याने झाडाला घेतला गळफास; साडेतीन ते चार एकरांत केली होती द्राक्ष शेती!

Hailstorm Damage: हातातोंडाशी आलेला घास हिरावला! मध्यरात्री गारपिटीचा तडाखा; आंबा-संत्रा बागांचे नुकसान, शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी!

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

SCROLL FOR NEXT