Temghar
Temghar 
पुणे

यंदा पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस टेमघरमध्ये

सकाळ वृत्तसेवा

पुणे : यंदा ऑक्‍टोबर संपत आला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा आहे. जूनपासून 26 ऑक्‍टोबरपर्यंत टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पाच हजार 174 मिलिमीटर पावासाची नोंद झाली. खडकवासला धरण साखळीत शनिवारअखेर 28.34 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत साडेतीन टीएमसीहून अधिक आहे. 

पावसाळ्यात जिल्ह्यात भीमा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली. त्यानंतर ऑक्‍टोबरच्या अखेरीस साठ्यात काही प्रमाणात घट होते; परंतु धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधून-मधून पाऊस पडत आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील वरसगाव आणि पानशेत धरण पूर्ण भरले आहे. टेमघर धरणात 81.28 टक्‍के आणि खडकवासला धरणात 94 टक्‍के साठा आहे. जिल्ह्यातील डिंभे, माणिकडोह, चासकमान, भामा आसखेड, पवना, नीरा देवधर, भाटघर, वीर ही प्रमुख धरणे पूर्ण भरली आहेत. उजनी धरणही पूर्ण भरले असून, 53.57 टीएमसी पाणीसाठा आहे. 

भीमा खोऱ्यातील स्थिती (26 ऑक्‍टोबरअखेर) 
धरणे पाणीसाठा (टीएमसीमध्ये) यंदाचा पाऊस (मिमीमध्ये) 
पिंपळगाव जोगे 3.64 1564 
माणिकडोह 9.03 1558 
येडगाव 1.94 1073 
वडज 1.17 915 
डिंभे 12.49 1677 
घोड 5.47 440 
विसापूर 0.57 442 
कळमोडी 1.51 2344 
चासकमान 7.57 1284 
भामा आसखेड 7.67 1906 
वडीवळे 1.07 4659 
आंद्रा 2.92 2360 
पवना 8.51 4017 
कासारसाई 0.57 1821 
मुळशी 17.49 4593 
टेमघर 3.01 5172 
वरसगाव 12.82 3651 
पानशेत 10.65 3673 
खडकवासला 1.86 1596 
गुंजवणी 3.69 3014 
नीरा देवधर 11.73 3738 
भाटघर 23.50 1688 
वीर 9.41 723 
नाझरे 0.59 876 
उजनी 53.57 424 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT