Kokan Highway 
पुणे

Chandani Chowk to Kokan: चांदणी चौकातून कोकणात जाणारा हायवे 5 ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद!

नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : चांदणी चौकातून कोकणात जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५ ऑगस्टपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

चांदणी चौकातून कोकणात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आदरवाडी आणि डोंगरवाडी (ता. मुळशी) या घाट परिसरातील रस्त्याला अतिवृष्टीमुळं एका बाजूनं तडा गेल्यानं रस्ता खचला आहे. त्यामुळं नागरिकांची सुरक्षितता तसंच दुर्घटना टाळण्यासाठी पाच ऑगस्टपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.

दरम्यान, मुळशी तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून अतिवृष्टी होत आहे. अतिमुसळधार पावसामुळं रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. पिरंगुट घाटात जागोजागी दरडीही कोसळल्या आहेत. चांदणी चौकातून कोकणाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर भुगाव, भुकुम, पिरंगुट, शिंदेवाडी या परिसरामध्ये महामार्गावर गुडघाभर पाणी साचते, त्यामुळं हे अपघातप्रवण क्षेत्र निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्याला सलग चौथ्या दिवशी पावसानं झोडपलं, तासाभरात रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; काही ठिकाणी गारपीट

Talwar Baba: भयंकर! तंत्र-मंत्र आणि भीतीचा खेळ... महाराष्ट्रातील ‘तलवार बाबा’चा काळा चेहरा उघड; 'असं' करायचा शोषण

Samruddhi Expressway Accidents : काय आहे 'हायवे हिप्नोसिस'? समृद्धीवर का होतायत अपघात? पूल ठरतात धोकादायक!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पावसाचा जोर ओसरला

RSS आणि बाबरी मस्जिद प्रकरणाचा अखेर उलगडा होणार, संजय दत्त समोर आणणार इतिहासाचा ‘आखरी सवाल’

SCROLL FOR NEXT