पुणे

रामटेकडी, महंमदवाडी येथील टेकडयांचा परिसर बनला तळीरामांचा अड्डा

संदीप जगदाळे

हडपसर : महापालिकेची मोकळी मैदाने व रामटेकडी, महंमदवाडी येथील वन विभागाच्या टेकडयांचा परिसर तळीरामांसाठी दारूचा अड्डा बनला असून. दररोज या परिसरात मदयपींच्या ओल्या पार्टया होत आहेत. मात्र महापालिका, पोलिस प्रशासन व वन विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या परिसरात टेकडया निर्जन आहेत. तसेच रात्रीच्यावेळी महापालिकेच्या मोकळ्या मैदानावर सुरक्षारक्षक नसतात. दोन्ही टेकडयांवर मोठया प्रमाणावर विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. वनक्षेत्रात हरणे, ससे मोठया संख्येने आहेत. मात्र या ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी कधीच गस्त घालताना दिसत नाहीत. याचाच फायदा तळीराम घेताना दिसत आहेत. दररोज सायंकाळी सातनंतर या ठिकाणी मद्यपी तरूणांचा अड्डाच भरलेला असतो. तळीरामांची टोळकी या ठिकाणी खुलेआम मदयपान करत असतात. अनेकदा त्यांच्यात वाद होत असल्याने फिरण्यासाठी येणा-या नागरिकांना त्याचा फटका बसतो. 

पर्यावरण प्रेमी संजय जगताप म्हणाले, ''वन विभागाच्या टेकडयांवर मदयपी अनेकदा दारूच्या बाटल्या रिचवून रिकाम्या बाटल्या त्याच ठिकाणी टाकत असतात. त्यामुळे परिसरात खूप प्रमाणावर कचरा जमा होत आहे. शिवाय दारूच्या बाटल्यांच्या फुटलेल्या काचांमुळे वन्यप्राण्यांना इजा होण्याची शक्यता आहे. हे मदयपी दारूच्या नशेत वृक्षांचीही नासधूस करत असतात. याबाबत वनविभाग मात्र मूग गिळून गप्प बसून असल्याचे चित्र आहे. त्यांच्या कामचुकारपणामुळे वनविभागाचे मोठे नुकसान होत असून, या तळीरामांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.'' 

रहिवासी संजना काळे म्हणाल्या, ''मी रोज भोसले गार्डन येथे व्यायामासाठी येते. जर मैदानावर सर्रासपणे दारूडे दारू पिण्याचा आनंद लुटत असतील व यावर पोलिस यंत्रणा काहीच उपाययोजना करत नसतील तर तळीरामांना पोलिसांचा वरदहस्त लाभत आहे की काय? असा प्रश्‍न पडत असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.''

रहिवासी तुषार बिनवडे म्हणाले, ''अगोदरच शहरासह उपनगर भागात महिला व तरुणींच्या छेडछाडीच्या घटनेत वाढ होत असताना जर महापालिकेच्या मैदानाचा गैरवापर दारूडे हे दारू पिण्यासाठी करत असतील तर राजकीय नेत्यांसह पोलीस देखील सर्वसामान्य जनतेवर अन्याय करत आहेत. या दारूड्यांवर कठोर कारवाईची गरज आहे.'' 

पर्यावरण प्रेमी प्रशांत जाधव म्हणाले, ''आजपर्यंत पालिकेच्या वतीने मोकळ्या मैदानाला रखवालदार नेमण्यात न आल्याने या भागातील तळीरामांसाठी मैदाने दारू पिण्यासाठी हक्काची जागा बनली आहे. सकाळ-संध्याकाळ मैदानात ज्येष्ठ नागरिकांसह महिलाही येत असतात. मदयपी तरूणांकडून अनेकदा शिवराळ भाषा वापरली जाते. खुले आम मदयपीत असणा-या तरूणांवर पोलिसांचा अंकुश नाही.'' 

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT