apple.jpg
apple.jpg 
पुणे

हिमाचलचे सफरचंद पुण्याच्या बाजारात दाखल, पण...

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड : गेल्या काही दिवसांपासून मार्केटयार्डातील फळबाजारात हिमाचल प्रदेश येथील सफरचंदाचा हंगाम सुरू झाला आहे. परदेशी बरोबर देशी सफरचंदाची आवक सुरू झाल्याने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तेजीत असलेले सफरचंदाचे भाव उतरले आहेत. सध्या किरकोळ बाजारात हिमाचल सफरचंद १००-१२० रुपये विकले जात आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्यापही आवक कमी आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत सध्या २०-२५ टक्क्यांनी  भाव जास्त आहेत. बाजारात १५ ऑगस्टनंतर सफरचंदाची आवक वाढेल, अशी माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

आरोग्यासाठी अधिक गुणकारी समजल्या जाणार्‍या सफरचंदास मार्केटयार्डातील फळबाजारात वर्षभर मागणी राहते. जगाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या सफरचंदाचे दर इतके असतात की दररोज सफरचंद खाणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते. परंतु हिमाचल सफरचंद बाजारात आल्यानंतर ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतात.

सफरचंदाचे गुणधर्म आणि त्याच्या मागणीचा विचार करता बाजारात वर्षभर सफरचंद पाहायला मिळतात. पावसाळा हा भारतीय सफरचंदाचा मुख्य हंगाम असतो. तीन ते चार महिन्यापूर्वी सफरचंदाची दोनशे ते अडीशे रुपये प्रतिकिलो भावाने विक्री होत होती. मात्र, सध्यस्थितीत हिमाचल प्रदेश येथून रिचर्ड, रॉयल, रेड गोल्ड हे भारतीय सफरचंद बाजारात येत असल्याने परदेशी सफरचंदाच्या मागणीत घट झाली आहे. परदेशी सफरचंदाच्या तुलनेत देशी सफरचंदाचे भावही तुलनेने कमी आहेत. सध्या किरकोळ बाजारात सफरचंद १०० ते १२० रुपये किलोच्या घरात आहे.

फळबाजारात वॉश्गिंटन, अर्जेंटिना, चिली, इराण, इटली, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका येथून वर्षभर परदेशी सफरचंदाची आवक होत असते. शीतगृहात साठवणूक केलेली ही सफरचंदे मागणीनुसार बाजारात विक्रीसाठी आणली जातात. त्याचा वाहतूक खर्च आणि साठवणूक खर्च अधिक असल्याने त्यांचे किरकोळ बाजारात येईपर्यंतचे दर वाढतात.-सलिम बागवान, व्यापारी मार्केट यार्ड.

भारतीय सफरचंद दोन ते तीन दिवसांनी बागेतून थेट बाजारात येतात. त्यांचा वाहतूक खर्च या परदेशी सफरचंदाच्या मानाने कमी असल्याने बाजारात त्यांचे दरही कमी असतात. दिवाळीपर्यंत भारतीय सफरचंदाचा हंगाम सुरू राहणार आहे. हळूहळू ही आवक आणखी वाढेल. -अरविंद मोरे, व्यापारी, मार्केट यार्ड. 

घाऊक बाजारातील सफरचंदाचे भाव - 

२०१९चे भाव- 
सफरचंद - 25 ते 30 किलोच्या पेटी - १५००-३०००

२०२० चे भाव - 25 ते 30 किलोच्या पेटी - १८००-४२००

कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदा हिमालच प्रदेश येथून बाजारात सफरचंद नेहमीप्रमाणे येईल का, अशी शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. परंतु, आता वाहतुक चांगल्या पध्दतीने सुरू झाली आहे. त्यामुळे मालाची आवक होणार आहे. काही व्यापारी हिमालच प्रदेश येथे जावून मालाची पाहणीही करून आले आहेत. त्यामुळे करोनाचा आवकवर परिणाम होणार नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT