Pune Municipal Corporation Sakal
पुणे

Pune News : महापालिकेला सुट्टी! श्रेयासाठी उड्डाणपूलाच्या कामाची काढली वर्कऑर्डर; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले भूमिपूजन

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसात लागणार असल्याने निवडणुकीत राजकीय पक्षांना श्रेय लाटण्याचा प्रकार आला समोर.

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढील काही दिवसात लागणार असल्याने निवडणुकीत राजकीय पक्षांना श्रेय लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक सुट्टीनिमित्त महापालिका बंद असतानाही विश्रांतवाडी आणि घोरपडी येथील उड्डाणपुलाच्या निविदेला स्थायी समितीची मान्यता नसतानाही कार्याआदेश (वर्कऑर्डर) देऊन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन उरकल्याचा प्रकार समोर आला आहे.

महापालिकेतर्फे विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौक येथे उड्डाणपूल आणि समतल विगलक (ग्रेड सेपरेटर) बांधले जाणार आहे. तर घोरपडी येथे पुणे मिरज रेल्वे मार्गावर उड्डाणपूल बांधला जाणार आहे. या कामासाठी १०९ कोटी १५ लाख रुपयांचे खर्च अपेक्षीत होता.

निविदा प्रक्रियेत मे. एस. एम. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीने ९५ कोटी २१ लाख ९९ हजार ५७४ इतक्या खर्चात हे काम करण्याची तयारी दर्शविल्याने ही निविदा अंतिम केली आहे. या निविदेला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिल्यानंतर कार्याआदेश देणे आवश्‍यक होते. मात्र, या नियमाला केराची टोपली दाखवत प्रकल्प विभागाने राजकीय दबावापोटी थेट कार्यादेश दिले.

घोरपडी येथील उड्डाणपुलाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वारजे येथील कार्यक्रमात ऑनलाइन करण्यात आले. तर विश्रांतवाडी येथील उड्डाणपूल व समलत विगलक या प्रकल्पाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यासाठी महापालिकेत दोन दिवसात अतिशय वेगाने या कामाची फाइल प्रकल्प विभागापासून ते आयुक्त कार्यालयापर्यंत फिरविण्यात आली. पण स्थायी समितीची बैठक गुरुवारी (ता.१४) तारखेला होणार असल्याने आयुक्तांच्या अधिकारात महाशिवरात्रीनिमित्ताने महापालिकेला सुट्टी असतानाही मान्यता देण्यात आली.

प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी याच दिवशी स्वाक्षरी करून कार्यादेश काढले आहेत. या निविदेचा हा प्रस्ताव आत स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, यामध्ये निर्णयामध्ये नियमांचे पालन झाले की नाही याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टोलवाटोलवी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT