वडूजमध्ये ‘होम मिनिस्टर’ला प्रतिसाद
खटाव, ता. २२ : महिला दिनाच्या निमित्ताने एलआयसी वडूज शाखेत शाखेचे उपव्यवस्थापक नंदकुमार बोराटे यांच्या संकल्पनेतून नारीशक्तीचा सन्मान करणारा ‘होम मिनिस्टर’ हा नावीन्यपूर्ण व मनोरंजक उपक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला विमा प्रतिनिधींना एकत्र आणत एलआयसीचा व्यवसाय वृद्धिंगत करण्याबरोबरच त्यांच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा, हा उद्देश ठेवण्यात आला होता. कार्यक्रमात गायक राहुल कोळी यांचा बहारदार मनोरंजनपर कार्यक्रम, ‘फन टाइम’ तसेच ‘होम मिनिस्टर’सारखे रंगतदार उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांना उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थित असलेल्या महिला विमा प्रतिनिधींनी आपल्या विविध कलागुणांचा सुरेख आविष्कार सादर केला. स्वतः आनंद घेत इतरांनाही आनंद देण्याचा अनोखा अनुभव या कार्यक्रमातून मिळाला. या प्रसंगी उपशाखा प्रमुख नंदकुमार बोराटे, सीएलआयए विश्वास मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. विमा प्रतिनिधी प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विकास अधिकारी रणजित माने यांनी आभार मानले.
01368
वडूज : येथील कार्यक्रमप्रसंगी नंदकुमार बोराटे, सीएलआयए व विमा प्रतिनिधी. (राजेंद्र शिंदे : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.