Dr Bhagwat Karad
Dr Bhagwat Karad sakal
पुणे

प्रामाणिक करदात्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम; डॉ. भागवत कराड

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘देशात अपेक्षित एक लाख कोटी रुपये वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) तुलनेत सध्या १.३० लाख कोटींचे जीएसटी संकलन होत आहे. प्रामाणिक करदाता, सरकार आणि कर सल्लागार यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे. आर्थिक समावेशकता, आर्थिक साक्षरता आणि डिजिटल व्यवहार यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे,’ असे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले.

अमनोरा फर्न क्लब येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कराड बोलत होते. महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एमटीपीए), ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (एआयएफटीपी), गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (जीएसटीपीएएम) आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एनएमटीपीए) यांच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘क्रेडाई’ चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, परिषदेचे चेअरमन नरेंद्र सोनवणे, ‘एआयएफटीपी’चे एम. श्रीनिवासा राव, ‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर, एस. एस. सत्यनारायण, मुख्य सहसमन्वयक शरद सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. कराड म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेवटच्या माणसापर्यंत योजना पोचावी, याचा प्रयत्न करीत आहे. विकासाच्या योजना राबविण्यात कर हा घटक महत्त्वाचा आहे. कर प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी कर सल्लागारांनी सूचना पाठवाव्यात. अर्थ मंत्रालयाकडून कर प्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रामाणिक करदाता हा अर्थव्यवस्थेचा कणा, तर कर सल्लागार हा सरकार आणि करदाता यांना जोडणारा दुवा आहे. त्यांच्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था सक्षम होत आहे. डिजिटल अर्थव्यवहारात वाढ झाली, तर प्रामाणिकता आणखी वाढेल.’’

सतीश मगर म्हणाले, ‘‘कर प्रणालीत मोठे बदल होत आहेत. पण कर भरताना काही अडचणी येतात. जीएसटीमुळे बांधकाम क्षेत्राला, तसेच ग्राहकांनाही फटका बसला आहे. कोरोनानंतर पुन्हा एकदा अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. या प्रणालीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रयत्न करावेत. व्यवसाय नीटपणे करता यावा, यासाठी अर्थ मंत्रालयाचा पुढाकार महत्त्वाचा आहे.’’ श्रीनिवासा राव यांनीही मनोगत व्यक्त केले. वृंदावन शहा व जयरामन यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रास्ताविक नरेंद्र सोनवणे यांनी केले. अनुज चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. शरद सूर्यवंशी यांनी आभार मानले.

प्रारंभी सीए योगेश इंगळे लिखित ‘जीएसटी शास्त्र’, स्वप्नील शाह लिखित ‘जीएसटी ऑन सर्व्हिस सेक्टर’ आणि सीए वैशाली खर्डे लिखित ‘अ प्रॅक्टिकल गाइड ऑन जीएसटी ऍक्ट’ या पुस्तकांचे प्रकाशन कराड यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी मंथन सत्रात ‘कनॉन्स ऑफ जस्टिस : सुप्रिम कोर्ट, हाय कोर्ट, टॅक्स ट्रिब्युनल’वर मुंबईतील ॲड. लक्ष्मीकुमारण, ‘रोल ऑफ अलाइड लॉज इन इंटरप्रिटेशन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ जीएसटी लॉ’ वर दिल्ली येथील ॲड. जे. के. मित्तल आणि जयपूर येथील ॲड. पंकज घिया, तर मानसिक तणाव यावर पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT