honest The vegetable seller return five lakh rupees in pune 
पुणे

भाजी विक्रेत्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! पैशांची गरज असताना परत केले ५ लाख रुपये

मंगेश कोळपकर

पुणे  : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे कंपनीरोबरील कंत्राट सुटले तरी, उमेद हरली नाही. भाजी विकून परिस्थितीशी लढणाऱया कुटुंबाच्या एका खात्यात पाच लाख रुपये अचानक येतात. मात्र, हे पैसे आपले नाहीत, असे लक्षात ठेवून ते कुटुंब पैसे संबंधितांना परत करण्यासाठी पाठपुरावा करतात, अन् आपला प्रामाणिकपणा दाखवून देतात. परिस्थिती कशीही असली तरी तत्व जपणारी काही माणसे समाजात आहेत, हेच यातून दिसून आले. 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अभिजीत आणि स्मिता गाडेकर या कुटुंबाची ही कथा. संबंधित सराफ पेढीने त्यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांना प्रशस्तीपत्रक दिले अन त्यांचे कौतुकही केले. ''आम्ही तर आमचे कर्तव्यच केले, बाकी काही नाही,''असेच  गाडेकर दांपत्याची त्यावर प्रतिक्रिया दिली. 

अभिजीत हे एका आयटी कंपनीमध्ये कॅंटिन चालवत होते. परंतु, लॉकडाउनमुळे त्यांचे कंत्राट गेले. त्यामुळे दोन लहानमुलांसह कुटुंबाची चरितार्थ कसा चालवायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. त्यामुळे त्यांनी पत्नीचा एक दागिना विकायचे ठरविले. त्यानुसार त्या पेढीकडे जाऊन त्यांनी तो दागिना मोडला. कंपनीने त्याचे पैसे त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केले. त्यामुळे त्या पेढीकडे गाडेकर दांपत्याचा खाते क्रमांक पोचला. त्या पैशातून अभिजीत यांनी मित्रासमवेत साई समर्थ सप्लायर्स नावाने भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. 

अभिजीत यांची पत्नी स्मिता यांच्या बॅंक खात्यात 8 जुलै रोजी 5 लाख रुपये जमा झाल्याचा एसएमएस त्यांच्या मोबाईलवर आला. एका सराफ पेढीकडून हे पैसे जमा झाल्याचे त्यांना बॅंकेतून समजले. त्यांनी संबंधित पेढी शोधली आणि त्यांच्याकडे पाठपुरावा करून ते पैसे 14 जुलै रोजी परत करण्यासाठी बॅंकेकडे पत्र दिले. त्यानंतर त्या सराफ पेढीच्या खात्यात ती रक्कम जमा झाली. पेढीतील एका कर्मचाऱयाकडून नजरचुकीने गाडेकर यांच्या बॅंक खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे उघड झाले. त्या पेढीनेही गाडेकर दांपत्याच्या प्रामाणिकपणाची दखल घेतली आणि संचालकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले.  

या बाबत अभिजीत म्हणाले, जे पैसे आमचे नाहीत, ते आले तरी त्याचा आपण काही वापर करायचा नाही. ते परत करायचे असेच आमच्यावर संस्कार आहेत. त्यानुसारच भाजी विक्रीचा व्यवसाय सांभाळून पाठपुरावा करून आम्ही ते परत केले. हे आमचे कर्तव्यच होते. त्यामुळे आमच्या डोक्यावरचे आेझे उतरल्यासारखे वाटले आणि समाधान वाटले.

 सराफ पेढीचे संचालक म्हणाले, पैसे भलत्याच खात्यावर जमा झाल्याचे आमच्या लक्षात आले होते. परंतु, पुन्हा ते आमच्या खात्यात जमा होण्यासाठी संबंधित खातेदाराचे ना हरकत प्रमाणपत्र बॅंकेकडे द्यावे लागते. त्यासाठी गाडेकर यांनी पुढाकार घेतला आणि तत्परतेने ही प्रक्रिया केली. त्यामुळे खरेच त्यांचे कौतुक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT