पुणे

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त बलिदान चौकात झेंडावंदन;

CD

PNE26W41181 -
फोटोओळ : सोलापूर : ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त बलिदान चौकातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करताना काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त बलिदान चौकात झेंडावंदन
काँग्रेसच्या वतीने हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण; स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ९ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बलिदान चौक येथे झेंडावंदन करून हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्मे, ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार आणि शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
आजच्या पिढीने स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, संघर्ष आणि देशभक्तीची प्रेरणा घेऊन लोकशाही, संविधान आणि स्वातंत्र्याची मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी कार्य केले पाहिजे. स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महान स्वातंत्र्यवीरांचे योगदान सदैव स्मरणात ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केले.
शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनीही स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन करताना स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
यावेळी नगरसेवक प्रा. नरसिंह आसादे, ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक खन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, रेखा बिनेकर, उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT