पुणे

पांढरेवाडी केंद्रातील शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान

CD

KRK26B03981
पांढरेवाडी (ता. पंढरपूर) ः गुणवंत शिक्षकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी गटशिक्षण अधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, केंद्रप्रमुख सोमनाथ जाधव-पाटील.

पांढरेवाडी केंद्रातील शिक्षकांचा सन्मान
करकंब : पांढरेवाडी केंद्रातील शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे व केंद्रप्रमुख सोमनाथ जाधव-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पांढरेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथीचे वीसपैकी वीस विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. जाधववाडी शाळेतील इयत्ता चौथीचे अकरा तर सातवीचे सात विद्यार्थी पात्र ठरले आहेत. याशिवाय कवडे वस्ती व खरातवाडी शाळेतील प्रत्येकी एक विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवू शकतो. या सर्व यशस्वी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणारे दत्तात्रय फाळके, स्नेहल आमले, योगिता अडगळे, धन्यता कवडे, आजिनाथ पवार यांचा गटशिक्षणाधिकारी डॉ.बिभीषण रणदिवे व केंद्रप्रमुख सोमनाथ जाधव - पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी श्री. रणदिवे यांनी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन करून हे यश शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची व गौरवाची बाब असल्याचे सांगितले. या यशाच्या पाठीमागे शिक्षक व विद्यार्थ्यांचे अविरत कष्ट, सातत्य, चिकाटी व समर्पण असल्याचे ते म्हणाले. गुणवत्ते बरोबरच पांढरेवाडी शाळेचा शालेय परिसर, बालोद्यान, मेडिटेशन पार्क या सर्व गोष्टी पाहून त्यांनी सर्वच कार्यरत शिक्षकांचे कौतुक केले. यावेळी केंद्रीय मुख्याध्यापक हरिदास अवचर, मेंढापूर शाळेचे मुख्याध्यापक अनिल कांबळे, आदर्श शिक्षक एकनाथ फाळके, आयेशा शेख, अमरजा काळे, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT