Hospital Hostess Sakal
पुणे

परिचारिका दिन : सलाम परिचारिकांनो सलाम..!

‘पहिला लॉकडाउन झाला तेव्हा मी सुट्टी घेऊन धुळ्याला घरी आले होते. कोरोनाची भीती पसरलेली होती.

सकाळ वृत्तसेवा

एक-दोन नाही, तर सलग चौदा महिने कोरोनाबाधीतांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांना ‘आंतरराष्ट्रीय परिचर्या दिनानिमित्त सलाम...

- अकल्पीता, माधवी दाबक

कोरोनाबाधितांच्या थेट संपर्कात राहून परिचारिका त्यांची दिवस-रात्र सेवा करत असून त्यांनी व्रत घेतलंय परिचर्याच! या कोराना उद्रेकाशी सामना करताना रूग्णसेवेतील मोठा वाटा उचलणाऱ्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अहोरात्र ‘कोविड ड्यूटी करणाऱ्या नर्सेसचे काही अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत. (Hostess Day Salute to Nurses)

‘पहिला लॉकडाउन झाला तेव्हा मी सुट्टी घेऊन धुळ्याला घरी आले होते. कोरोनाची भीती पसरलेली होती. घरच्यांनी परत पुण्याला जाऊन हॉस्पिटलमध्ये काम करू नकोस, असं सांगितलं. पण मला परत जायचंच होत. मनात आलं, की मी घेतलेल्या नर्सिंगच्या शिक्षणाचा मग उपयोग काय? आणि मी परत येण्याचा निर्णय घेतला,’’ प्रिया सांगत होती.

‘कोविड ड्यूटी करण्याची इच्छा आहे का’, अशी विचारणा हॉस्पिटलने केल्यावर बरेच जण तयार झाले. अर्थात मनात भीतीही होती. काहींच्या कुटुंबीयांनी घरी परत बोलावलं; पण निकिता म्हणाली, ‘‘कोणालाच पळून जायचं नव्हतं. उलट जिथे त्यांची गरज आहे, तिथे हजर राहायचं होतं.’’

नर्सिंगचं काम करताना चौफेर लक्ष आणि प्रसंगावधान ठेऊन तत्परतेने काम करावं लागतं. याबाबत धनश्री म्हणाली, ‘‘एक दिवस खूप जास्त पेशंट शिफ्ट होत होते. आयसीयूचे बेड उपलब्ध झाला, की एकीकडे शिफ्टिंगची तयारी करत असताना सहकारी नर्सला तातडीने फोन करून नवीन पेशंट तयार ठेवायला सांगत होते. त्या दिवशी जेवायलाही वेळ मिळाला नाही.’’ धनश्रीला अर्थ्रायटीसचा त्रास आहे. त्यामुळे स्वतःच्या आवश्यक गोळ्या घेऊन ती ड्यूटी करत राहिली. आपण घेतलेल्या काळजीमुळे पेशंट बरा होऊन बाहेर पडतो, तेव्हा नर्सला खूप समाधान मिळतं.

कामाचा ताण सांभाळत पेशंटबरोबर काम करताना नर्सचं मनही वेगवेगळ्या भावनिक आंदोलनांमधून जात असतं; पण त्यावेळी तटस्थपणे ड्यूटी करत राहणं, ही एक परीक्षाच असते. स्वातीच्या एका ड्युटीमध्ये १९ ‘कोड ब्ल्यू’ कॉल्स झाले. ती सांगत होती, ‘‘खूप टेन्शन आलं होतं. चिडचिड वाढली होती. तो दिवस खूपच अस्वस्थ करणारा होता. पेशंटला वाचवण्यासाठी आपण एखाद्या यंत्रासारखं काम करत आहोत, असं वाटत होतं आणि तरीही माझ्या ड्युटीमध्ये पेशंट खराब नाही झाला पाहिजे, एवढा एकच विचार मनात होता.’’ या सर्वांचे हे अनुभव ऐकून एक वाक्य आठवत होतं ते म्हणजे कोणताही पेशंट हॉस्पिटलमधून बरा होऊन घरी जाण्यामागे २० टक्के श्रेय डॉक्टरांचं असतं, तर ८० टक्के त्या पेशंटची काळजी घेणाऱ्या नर्सेसचं असतं!

उषाच्या मते एक नर्स म्हणून काम करताना निर्णयक्षमता आणि धाडसीपणा वाढतो. धनश्री म्हणाली की, कोविड ड्यूटी करण्यासाठी आईचा आणि नातेवाइकांचाही विरोध होता; पण नंतर थोडी सुटी मिळाल्यावर ती जेव्हा घरी गेली तेव्हा आईला तिचा खूप अभिमान वाटत होता. या व्यवसायाविषयी सगळ्यांनाच आता आदर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT