‘हॉटेल जयशंकर’चा लांबोटी चिवडा सातासमुद्रापार
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील लांबोटी (ता. मोहोळ) येथील खताळ कुटुंबियांचे ‘जयशंकर’ हॉटेल आहे. १९७२ च्या दुष्काळी स्थितीत लांबोटीचे शंकरराव खताळ व त्यांचे मोठे बंधू, यांच्या साथीने रुक्मिणीताईंनी झोपडीत कॅन्टिन सुरू केले. सुरवातीचे काही दिवस संघर्ष केला, अनेक संकटे आली; पण रुक्मिणीताईंनी प्रचंड मेहनत करीत जिद्द आणि चिकाटी कधीच सोडली नाही. पती शंकररावांनी कन्टिनसमोर कसरतीचे खेळ सुरू केले, ग्राहकांना आकर्षित करणे हाच त्यांचा उद्देश होता. रुक्मिणीताईंच्या चिकाटी आणि मेहनतीला पती शंकररावांनी खंबीर साथ दिली आणि १५-२० वर्षांनंतर त्यांचा हॉटेलचा व्यवसाय वाढला. मुलगा तानाजी व गणेश हे मोठे झाले, त्यांनी आईला साथ दिली. रुक्मिणीताई स्वत: घरीच मकेचा चिवडा तयार करायच्या. पतीच्या निधनानंतर रुक्मिणीताईंनी दोन्ही मुलांच्या साथीने ‘हॉटेल जयशंकर’ ब्रॅंड बनवले. खमंग लांबोटी चिवडा व शेंगा चटणी असे दोन ब्रॅंड तयार केले, ग्राहकांनी दोन्ही ब्रॅंड डोक्यावर घेतले. हॉटेल जयशंकरचा ‘लांबोटी चिवडा’ आता महाराष्ट्र, भारतातील विविध राज्यातील लोक तर आवडीने खातात, घेतातच; पण तो चिवडा आता सौदी अरेबिया, इंग्लंड, अमेरिका, नेदरलॅंड यासह इतरही अनेक देशांमध्ये पोहचला आहे.
-----------
चौकट
‘हॉटेल जयशंकर’चा
‘कुंदा चहा’ नवा ब्रॅंड
साधा चहा, स्पेशल चहा, केटी, कॉफी अशांमध्ये हॉटेल जयशंकर खास होतेच; पण आजी रुक्मिणीताई, वडील तानाजी आण्णा यांच्या पावलावर पाऊल टाकत चुलते गणेश (आप्पा) खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय खताळ, रुद्राक्ष खताळ यांनी चुलत बंधू अनिरुद्ध व संग्राम या सर्वांनी मिळून व्यवसाय वाढवला. त्यांनी ‘कुंदा चहा’चा नवा बॅंड तयार केला; काही महिन्यांतच तो अख्ख्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला आहे.
------------------
चौकट
सामाजिक बांधिलकी अन्
३५० हून अधिक जणांना रोजगार
लांबोटी (ता. मोहोळ) परिसरात स्वत:च्याच शेतात, जागेत खताळ बंधूंनी पेट्रोल पंप, हॉटेल, किराणा मालाचे मार्ट सुरू केले. तेथे नफ्यापेक्षा पंचक्रोशीतील तरुण-तरूणींना, महिलांना हक्काचा रोजगार मिळावा, हाच मुख्य हेतू खताळ बंधूंनी ठेवला. त्याठिकाणी सध्या ३५० जणांच्या हाताला काम मिळाले आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या विमलताई तानाजी खताळ यांची सर्वांना मोलाची साथ आहे. दुष्काळ असो की कोरोना, अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक संकटात अक्षय खताळ यांनी आजोबा शंकरराव, आजी रुक्मिणीताई, वडील तानाजी खताळ यांच्या पावलावर पाऊल ठेवत गरजूंना नेहमीच सामाजिक बांधिलीकतून मदत केली. यासाठी चुलते, आई, चुलत बंधूंनीही त्यांना खंबीर साथ दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.