Housing Society esakal
पुणे

Housing Society : मतदारयादी अद्ययावतीकरणास गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे अध्यक्ष, सचिवांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

पुणे ः राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यासह राज्यातील महानगरांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. यासाठी शहरातील सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांना पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या २२ ऑगस्ट २०१२ च्या परिपत्रकानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष व सचिव यांना मतदार याद्यांच्या पुनरीक्षण कार्यक्रमासाठी ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवकांनी आपापल्या गृहनिर्माण संस्थेतील मतदार नोंदणीस पात्र होणारे रहिवासी, सोसायटीतील जागा सोडून गेलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती यांची यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना पुरवावी आणि सोसायटीतील रहिवाशांना मतदार नोंदणी व दुरुस्ती करून घेण्याबाबत आवाहन करावे, असे या निवडणूक आयोगाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेत मतदान केंद्र सुरु करण्याकरिता आपापल्या गृहनिर्माण संस्थेचे नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, अंदाजित मतदार संख्या आदी माहितीसह आपापल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या http://ceo.maharashtra.gov.in ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता या संकेतस्थळावरील https://forms.gle/twLTGpjzzy2x9eV36 व https://forms.gle/z261Ah4DDgQxSEvs9 या गुगल लिंकवर मतदार नोंदणी अर्ज भरण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्याची सूचना आयोगाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Census 2026 40 Questions List : जनगणनेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमाती अन् विशिष्ट जातींची होणार नोंद; पाहा 40 प्रश्नांत काय?

Raj Thackeray : पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडीवरून राज ठाकरे संतापले; म्हणाले- ज्यांना सत्ता दिली त्यांनाच जाब विचारा

Sangli Milk Collection Drop : FDA च्या धाडींमुळे सांगलीतील दुधाचा 'बनावट खेळ' बंद? तब्बल 78 हजार लिटरने दुधाची आवक घटली; पाहा आकडेवारी

Marathi News Live Updates : बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार? मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Shivsena Express: कोकण प्रवास मोफत करता येणार, गणेशोत्सवासाठी मुंबईतून विशेष ट्रेन सुटणार; कुठून आणि कधी?

SCROLL FOR NEXT