Mucormycosis Sakal
पुणे

औषधाविना उपचार कसे? पुणे शहरातील डॉक्टरांचा सवाल

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शहराबरोबरच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून या आजाराच्या रुग्णांना पुण्यात आणले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - म्युकरमायकोसिस (Mucormycosis) या बुरशीजन्य आजाराची (Sickness) औषधे (Medicine) मिळता मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांना (Patient) उपचारासाठी (Treatment) रुग्णालयांमध्ये (Hospital) दाखल करून तरी काय फायदा, असा थेट सवाल शहरातील डॉक्टरांनी (Doctor) केला आहे. (How to treat without medicine Pune doctors question)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शहराबरोबरच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून या आजाराच्या रुग्णांना पुण्यात आणले जात आहे. त्यामुळे पुण्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. एकेका रुग्णालयामध्ये २० ते ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे या आजारावरील लिंपोसोमल अम्फोटेरिसिन-बी या इंजेक्शनची मागणी वाढली. एकेका रुग्णांना दोन ते दहा इंजेक्शनच्या वायल एका वेळी द्याव्या लागतात. त्याचा थेट परिणाम या इंजेक्शनचा तुटवडा होण्यात झाला असल्याची माहिती शहरातील रुग्णालयांनी दिली.

म्युकरमायकोसिस या आजारावरील प्रभावी औषध मिळत नसल्याने रुग्णावर उपचार करायचे कसे, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. रुग्णालयात आणि बाहेरही औषध मिळत नसल्याचे प्रत्येक रुग्णाचे नातेवाईक सांगत आहेत. अशा वेळी आणखी रुग्णांना दाखल करून अजून गुंतागुंत वाढविण्यात काय अर्थ आहे, असा सूरही डॉक्टर आता काढत आहेत.

अशी आहे स्थिती

  • शहरातील रुग्णालयांनी एक-एक हजार इंजेक्शनच्या वायलची नोंदणी केली आहे

  • रुग्णालयांच्या औषध दुकानदारांनुसार त्या वायलचा पुरवठा होत नाही

  • गेल्या आठवड्यापर्यंत रुग्णालयांमधील औषध दुकानांमध्ये इंजेक्शन मिळत होते

  • चार दिवसांपासून इंजेक्शनच्या मोजक्याच वायल रुग्णालयांना मिळत आहेत

  • वितरकांकडेही या औषधांची सातत्याने मागणी होत आहे

या आजारासाठी रुग्णालयात औषध नाही, अशा वेळी उपचार करताना मर्यादा येतात, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यामुळे औषध उपलब्ध असलेल्या रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले.

- ताराबाई जाधव, परभणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT