पुणे

बायको नांदायला येत नसल्याने पतीने केले अनोखे आंदोलन

दत्ता म्हसकर

आई-वडिलांकडे राहण्यास आलेली बायको नांदायला येत नाही यासाठी टॉवरवर चढून जोपर्यंत पत्नीला आणणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही.

जुन्नर - गोद्रे ता. जुन्नर येथे माहेरी आलेल्या पत्नीने सासरी येण्यास नकार दिल्याने पती केशव काळे, रा. कुरकुंडी ता. संगमनेर या युवकाने थेट उंच टॉवरवर चढून आंदोलन केले.

आई-वडिलांकडे राहण्यास आलेली बायको नांदायला येत नाही यासाठी टॉवरवर चढून जोपर्यंत पत्नीला आणणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचे त्याने यावेळी उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. त्याने दोरखंड ही सोबत नेला असल्याचे सांगण्यात आले. ही घटना आज शुक्रवार ता. १९ रोजी दुपारी घडली. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली अखेर पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी त्याच्या पत्नीला समोर आणून समझोता करण्याचे आवाहन केल्यानंतर सदर तरुण दीड तासानंतर टॉवर वरून खाली आला.

याबाबतची समजलेली माहिती अशी की, गोद्रे येथील तरुणीशी केशव याचा डिसेंबर २१ मध्ये कुरकुंडी-घारगाव येथे विवाह झाला होता. पती-पत्नी मध्ये होत असलेल्या वादामुळे त्याची पत्नी माहेरी राहण्यास आली. आज केशव पत्नीला घरी घेऊन जाण्यासाठी आला यावेळी पत्नीने सोबत येण्यास नकार दिल्याने तो थेट टॉवरवर चढला.

पिंपळगाव सिध्दनाथ व अलदरेचे पोलीस पाटील खंडागळे व सुमित लोहोटे यांनी पोलीसांना कळविले. बायको नांदायला येत नसल्याने त्याने वेगळीच शक्कल लढवून या आपली मागणी पूर्ण करण्यासाठी पिंपळगाव सिध्दनाथ येथील पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून बसला.

केशव काळे याच्या सासू सासाऱ्यांनी त्याने यापूर्वी गोद्रेच्या डोंगरावर चढून उडी मारण्याची धमकी दिली होती. त्याचे विरोधात आम्ही तक्रार अर्ज दिले असल्याचे रोहिदास भोजने यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT