Accident on Daund Pune-Solapur Highway esakal
पुणे

Highway Accident : पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात पती-पत्नी जागीच ठार; लक्झरीनं दोघांना उडवलं..

यादव कुटुंब मुळचे खानदेशातील असून गेल्या काही वर्षांपासून मळद येथे स्थायिक झाले आहे.

सावता नवले

अपघातात मृत्यू झालेल्या सुमन यादव या दौंड पंचायत समिती माजी सदस्य बबनराव रणवरे यांच्या भगिनी तर गंगाधर यादव हे दाजी होत.

कुरकुंभ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway) दौंड तालुक्यातील मळद येथे रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या लक्झरी बसणे धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी (ता. २७) सकाळी दहाच्या सुमारास घडला.

मळद येथील दत्तात्रय गंगाधर यादव व त्यांची पत्नी सुमन यादव हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना घागरेवस्ती जवळील दुभाजकाच्या ठिकाणी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी पाठीमागून सोलापूर बाजूकडून येणाऱ्या लक्झरी बसने (एमएच २४, एबी ५२००) जोरात धडक दिल्याने दत्तात्रय गंगाधर यादव व त्यांची पत्नी सुमन यादव यांचा गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला.

यादव कुटुंब मुळचे खानदेशातील असून गेल्या काही वर्षांपासून मळद येथे स्थायिक झाले आहे. यादव कुटुंबीयांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलगा रोहन याला उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. अपघातात मृत्यू झालेल्या सुमन यादव या दौंड पंचायत समिती माजी सदस्य बबनराव रणवरे यांच्या भगिनी तर दत्तात्रय गंगाधर यादव हे दाजी होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT