husband wife on indefinite hunger strike to demand cancellation wrong registrations and alterations farm land pune sakal
पुणे

Pune News : चुकीचा फेरफार रद्दसाठी दांपत्याचे बेमुदत उपोषण

दाम्पत्याच्या उपोषणाचा तिसरा दिवस; जिल्हाधिकारी कार्यालयाकडून साधी दखलही घेण्यात आली नाही

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर झालेल्या चुकीच्या नोंदी आणि फेरफार रद्द करण्याच्या मागणीसाठी मुळशी तालुक्यातील अंबडवेट येथील पती-पत्नी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.

बुधवारी (ता.८) या दाम्पत्याच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता, परंतू अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून साधी दखलही घेण्यात आली नसल्याचे या दाम्पत्याने सांगितले. विजय दगडू ओव्हाळ आणि वनिता विजय ओहाळ असे या उपोषणकर्त्या दाम्पत्याचे नाव आहे.

वडिलोपार्जित शेतजिमनीच्या सातबारा उताऱ्यावर महसूल विभागाकडून चुकीच्या नोंदी लागल्या आहेत. शिवाय याबाबतचा फेरफारही चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप ओव्हाळ दाम्पत्याने केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, चौकशीत दोषी आढळणारांवर कडक कारवाई करावी आणि आमच्या वडिलोपार्जित जमिनीवर असलेल्या पुर्वीच्या नोंदी करुन द्याव्यात, अशी मागणी विजय ओव्हाळ यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO News: नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी EPFO चा महत्त्वपूर्ण निर्णय; कुटुंबियांनाही फायदा होणार, नवीन नियम काय?

PM Modi: ओमानमध्ये मोदींचं स्वागत बघून मुस्लिम जग हादरलं! पाकिस्तानी एक्सपर्टचा संताप, ''भारताकडे एवढं लक्ष...''

Mumbai News: मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास होणार, ५१ टक्के भाडेकरूंची संमती पुरेशी; उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

Kolhapur Election : वीस प्रभागांतून तब्बल ३२९ इच्छुक; काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान

Viral Video : 'हा' व्हिडिओ पाहून चीड येईल! भररस्त्यात जावयाचे सासूसमोर लोटांगण, तरीही पत्नी मिळालीच नाही, नेमका काय प्रकार?

SCROLL FOR NEXT