पुणे

हुतात्मा राजगुरू बाल कुस्ती स्पर्धा अन्यत्र

CD

राजगुरुनगर, ता. ८ : खेड येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) ठेवल्याने हुतात्मा राजगुरू बाल कुस्ती स्पर्धेचे ठिकाण बदलण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. क्रांतीदिनी होणारी ही स्पर्धा आता आळंदी-वडगाव घेणंद रस्त्यावरील नक्षत्र मंगल कार्यालयात होणार असून, क्रीडा संकुलाचा वापर गोदामासारखा होत असल्याबद्दल क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने रविवारी (ता. ९) मुले व मुलींच्या बाल गटासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालीम संघाचे पदाधिकारी स्वखर्चाने दरवर्षी हुतात्मा राजगुरू बाल कुस्ती स्पर्धा, महाराष्ट्र केसरी निवड चाचणी आणि खेड केसरी अशा तीन महत्त्वाच्या स्पर्धांचे आयोजन करतात. या स्पर्धांसाठी हक्काचे ठिकाण असलेल्या क्रीडा संकुलात सध्या ईव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐनवेळी स्पर्धेचे ठिकाण बदलावे लागल्याने आयोजकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.
तालुका क्रीडा संकुलाचा वापर अलीकडे केवळ निवडणूक साहित्याचे गोदाम, निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणीसाठीच केला जात असल्याचे चित्र आहे. यामुळे संकुलातील बॅडमिंटन कोर्ट आणि व्यायामशाळा सातत्याने बंद असतात. क्रीडा संकुल उभारण्यापूर्वी निवडणुकांसाठी पर्यायी व्यवस्था केली जात होती. मात्र, आता निवडणूक यंत्रणेने संकुलाचा ताबा घेतल्याने खेळाडूंच्या सरावावर आणि स्पर्धांवर गदा आली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे स्थानिक खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी असून क्रीडा संकुल खेळांसाठी मोकळे करण्याची मागणी होत आहे.

क्रीडा संकुलाचा अधिकाधिक वापर क्रीडाविषयक उपक्रमांसाठी होणे अपेक्षित आहे. मात्र संकुलात ईव्हीएम मशीन ठेवून स्पर्धा अन्यत्र घ्यायला लावणे हे प्रशासनाच्या क्रीडाविषयक अनास्थेचे स्पष्ट उदाहरण आहे. प्रशासनाने तातडीने या ईव्हीएम दुसरीकडे हलवाव्यात आणि खेळाडूंसाठी क्रीडा संकुल खुले करून द्यावे.
- बाळासाहेब चौधरी, अध्यक्ष, खेड तालुका कुस्तीगीर तालीम संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Global Warming: ‘सुपर एल निनो’मुळे १५ हजार मृत्यूचा धोका; शिकागो विद्यापीठाचा इशारा, जमीन आणखी तापणार

SCROLL FOR NEXT