पुणे

बियाणे

CD

महाबीजच्या बियाणांची थेट तालुकास्तरावर वितरण

सातारा, ता. २३ : जिल्ह्यातील पशुधनासाठी शेतकऱ्यांना चारा बियाण्यांचे मोठ्या प्रमाणावर वाटप सुरू केले आहे. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजनेतून २०२६-२७ अंतर्गत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळकडून (महाबीज) खरेदी करण्यात आलेली ही बियाणे थेट तालुकास्तरावरील पंचायत समित्या आणि शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांपर्यंत वितरित करण्यात आली आहेत.
या मोहिमेत प्रामुख्याने हायब्रीड चारा बाजरी, गोड ज्वारी आणि मका यांसारख्या उच्च उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांचा समावेश आहे. यामध्ये एकूण सात हजार ३०६ किलो हायब्रीड चारा बाजरी, दहा हजार ७२५ किलो हायब्रीड गोड ज्वारी, २५ हजार ८ किलो हायब्रीड मका आणि २३ हजार १७२ किलो हायब्रीड चारा मका ही बियाणे वितरणासाठी उपलब्ध करून दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी परिसरातील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा आणि हे बियाणे आपल्या ताब्यात घ्यावे. पावसाचे आगमन होताच ही बियाणे त्वरित पेरणी करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून चाराटंचाईची बिकट परिस्थिती उद्‍भवणार नाही आणि जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता सुरक्षित राहून पशुपालकांचे होणारे नुकसान टाळता येईल. दुष्काळजन्य संकटाचा सामना करण्यासाठी आणि पशुधन वाचवण्यासाठी पशुपालकांनी या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. दिनकर बोर्डे यांनी केले आहे.

.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT