पुणे

'बापूंच्या राष्ट्रीय विचारांमुळे हिंदी निवेदक बनलो'

सकाळवृत्तसेवा

पुणे -  माझा मोठा भाऊ ऑल इंडिया रेडिओमध्ये इंग्रजीतील प्रसिद्ध निवेदक होता, त्यामुळे सुरवातीच्या काळात मी इंग्रजीमध्ये निवेदन करायचो. माझी आई गांधीजी यांच्या विचारांचे अनुकरण करणारी समाजसेवी होती. गांधीजी समानतेचा धागा म्हणून साध्या सोप्या हिंदीचा आग्रह धरत. गांधीजींचा संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी दोन गोळ्या झाडून खून झाला, तेव्हा मी तिथेच होतो. त्या घटनेनंतर मी पक्के ठरविले आयुष्यात हिंदी निवेदक म्हणूनच काम करायचे, असे प्रतिपादन सिलोन रेडिओवरील प्रसिद्ध ‘बिनाका गीतमाला’चे निवेदक अमिन सायानी यांनी केले.

संवाद पुणे आणि तेजस थिएटर यांच्यातर्फे सायानी यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी महापौर मुक्ता टिळक, संवादचे सुनील महाजन, तेजस थिएटरच्या आरती दीक्षित, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, सुनील महाजन, अशोक विखे उपस्थित होते. मानपत्राचे वाचन गाडगीळ यांनी केले. सायानी यांच्या सन्मानार्थ या वेळी १९५२ ते १९७७ दरम्यानच्या गाण्यांची ‘सफर गीतमाला का’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

पुण्यातील आठवणींना उजाळा देताना सायानी म्हटले, ‘‘पुण्याशी माझा लहानपणापासून संबंध आला. इथे आल्यावर मला पहिल्यांदा थंडी काय असते हे कळाले. माझी पहिली मानलेली बहीण शीला नरसी पुण्यातील होती. तिच्या हॉस्पिटलच्या सामाजिक कामासाठी निधी जमविण्यासाठी आम्ही अमिताभ आणि जया बच्चन यांना बोलविले होते. जया पुण्यातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. त्यामुळे सर्वांनी तिच्याभोवती गर्दी केली. अमिताभ मात्र एकटाच उभा होता. तेव्हाच त्याने म्हटले होते, की ‘एक दिवस माझापण येईल’ आणि त्याने ते खरे करून दाखविले.’’ 

मैं ‘सायाना’ हूँ और नाम है ‘सायानी’
अमिन सायानी यांचा उल्लेख बरेच लोक ‘सयानी’ असा करतात. ती चूक दुरुस्त करत ते म्हणाले, ‘‘सयानी हा शब्द बुद्धिमान, चतुर स्त्रीसाठी वापरला जातो; पण मी पुरुष आहे, त्यामुळे ‘मैं सायाना हूं और नाम है अमिन सायानी.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT