Ganapati Sakal
पुणे

‘मूर्ती आमची, किंमत तुमची’

पुण्यात मनसेचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : गणेशोत्सवात भाविकांना दिलासा देण्यासाठी ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ असा उपक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शहरात राबविण्याचे ठरविले आहे. सुमारे ४ हजार गणेशमूर्ती त्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (Pune News)

कोरोना काळातील आर्थिक संकट आणि गणेशमूर्तीच्या जादा भावामुळे सर्वसामान्य नागरिकांना गणेशमूर्ती घेणे परवडणारे राहिले नाही. वाढत्या महागाईने गणेश उत्सव कसा करायचा ? असा प्रश्न सर्वसामान्य जनते समोर आहे. म्हणून मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी रविवार पेठ येथे चार हजार गणेश मूर्ती नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यात सर्वप्रकारच्या गणेश मूर्ती नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील मात्र त्याची किंमत नागरिकांनी ठरवायची आहे. नागरिकांनी श्री गणेशाची मूर्ती घेतल्यानंतर मंगल कलशात ऐच्छिक देणगी टाकून मूर्ती घेऊन जायची आहे.

या उपक्रमाची सुरुवात येत्या सोमवारी (ता. ३०) दगडूशेठ हलवाई गणपतीचे अध्यक्ष अशोकराव गोडसे आणि कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते होणार आहे. मनसे नेते अमित ठाकरे हे या उपक्रमास भेट देणार आहेत. हा उपक्रम रविवार पेठेतील संत नामदेव चौकात राबविण्यात येणार आहे, असे गवळी यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT