naval-kishore-ram 
पुणे

Coronavirus : संसर्ग रोखल्यास ‘पुणे मॉडेल’ ठरेल! - नवल किशोर राम

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘कोरोना विषाणूचा संसर्ग भारत कशाप्रकारे रोखतो आहे, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. त्यातही पुण्याकडे सर्वाधिक लक्ष आहे. जर आपण त्यात यशस्वी झालो, तर ते ‘पुणे मॉडेल’ ठरणार आहे,’’ असे सांगून ‘‘सध्याचा बंद प्राथमिक स्तरावरील आहे. त्यामागे अडचण करणे हा हेतू नाही. आणखी कडक निर्णय घेण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

कोरोनाचा संसर्ग रोखणे, हे सर्वांत मोठे आव्हान आहे, तो रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे हा प्रभावी उपाय आहे. त्यादृष्टीने जीवनावश्‍यक वस्तू वगळता अन्य सर्व बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे, त्यातून नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आवाहन केले.

ते म्हणाले, ‘‘आम्ही काढलेल्या आदेशात काही त्रुटी असतील, त्या दुरुस्त करू. परंतु आणखी काही कडक पावले उचलली जाणार आहेत. कदाचित सध्यापेक्षा त्या दहापट कडक असतील. हे वेगळे संकट आहे, त्यामुळे एकमेकांना सहकार्य करण्याशिवाय पर्याय नाही.’’

जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. पुण्यापेक्षा पिंपरी- चिंचवडमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण अधिक सापडले आहेत, त्यामुळे तेथे कडक उपयोजना कराव्या लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे; मुंबई दौरा तूर्तास स्थगित, सरकारला ३ महिन्यांचा थेट अल्टिमेटम; ​मंत्री विखे पाटील, दादा भुसे अन् सुरेश धसांच्या मध्यस्थीला यश

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

SCROLL FOR NEXT