पुणे

श्रीराम महिला बी.एस्सी विद्यार्थीनींची आयआयटीएम, पुणे येथे अभ्यास भेट

CD

BON26B01885
पुणे : येथील आयआयटीएमला अभ्यास भेट देऊन माहिती घेताना विद्यार्थिनी.

श्रीराम महिला महाविद्यालयाच्या
विद्यार्थिनींचा पुणे अभ्यास दौरा
.........
बोंडले, ता. १ : पानीव (ता. माळशिरस) येथील श्रीराम शिक्षण संस्था संचलित श्रीराम महिला विज्ञान महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थिनींनी नुकताच अभ्यास दौरा पूर्ण केला. त्यांनी पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीला भेट देऊन हवामानशास्त्र क्षेत्रातील आधुनिक संशोधनाची प्रत्यक्ष माहिती घेतली.
या भेटीदरम्यान संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. रेणू दास यांनी विद्यार्थिनींना भारतीय मान्सूनचा अधिकृत अंदाज, चक्रीवादळ संशोधन, हवामान बदल अभ्यास तसेच विविध अत्याधुनिक प्रयोगशाळांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थिनींसाठी आयोजित प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत महाविद्यालयातील गौरी महादेव शेंडे व कीर्ती ज्ञानेश्वर काटे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत क्रमांक पटकावला. त्यांचा शास्त्रज्ञांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी मॉन्सून अंदाज प्रणाली, उष्णकटिबंधीय हवामान बदल विश्लेषण, चक्रीवादळ अलर्ट प्रणाली,‘दामिनी’ वीज अंदाज ॲप तसेच जमिनीतील ओलावा मोजणाऱ्या रडार तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष अनुभवातून जाणून घेतली. याप्रसंगी प्रा. अभिजित बाबर, प्रा. ज्योती फुले, प्रा. कोमल घाडगे, प्रा. गणेश शेळके आदी शिक्षक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Heatwave : विदर्भात उन्हाची लाट कायम; अकोला-अमरावती राज्यात ‘हॉट’, पुढचे चार दिवस 'येलो अलर्ट'

MPSC Success Story भावंडांची स्पर्धा परीक्षेत भरारी! पल्लवीची धर्मादाय विभागात, तर पंकजची महसूल सहाय्यक पदाला गवसणी, सातत्य अन् कठोर मेहनतीचे फळ..

यंदाचा मे महिना 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर ! ट्रिपल राजयोगाचा फायदा, पैशांची बरसात आणि करिअरमध्येही होणार प्रोमोशन

Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

महाराष्ट्र हादरला! गुप्तधनासाठी स्मशानात अघोरी पुजा, कासव-घुबडासह विधवा-कुमारिकांचा वापर

SCROLL FOR NEXT