Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune Municipal Lawyers : पुणे महापालिकेच्या पॅनलवर वकिलांना नियमबाह्य पद्धतीने मुदतवाढ

पुणे महापालिकेच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी न्यायालयात वकिलांची नियुक्ती केली जाते. पण विधी विभागातर्फे ही भरती करताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी न्यायालयात वकिलांची नियुक्ती केली जाते. पण विधी विभागातर्फे ही भरती करताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

पुणे - महापालिकेच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी न्यायालयात वकिलांची नियुक्ती केली जाते. पण विधी विभागातर्फे ही भरती करताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे. जाहीर प्रकटन देऊन वकिलांचे अर्ज मागवून पॅनेलवर नियुक्ती करणे आवश्‍यक असताना कोरोनाचे कारण पुढे करून विधी विभाग मुदत संपल्यानंतरही पुन्हा त्याच वकिलांकडून काम करून घेत आहे, असा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे.

महापालिकेच्या विविध विभागांचे न्यायालयात खटले सुरू आहेत, तसेच नव्यानेही खटले सुरू होतात. त्यावेळी महापालिकेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी वकिलांचे पॅनेल विधी विभागाकडून नियुक्‍त केले जाते. या नियुक्‍त्या वर्तमानपत्रात जाहिरात देऊन, अर्ज मागवून, निवड प्रक्रिया पूर्ण केली जाते. गेल्या वर्षभरापासून जुन्या पॅनेलला चुकीच्या पद्धतीने मुदतवाढ देत असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.

महापालिका आयुक्‍तांनी १३ ऑक्‍टोबर २०२१ मध्ये वकिलांच्या पॅनेलला मुदतवाढ दिली पण एका महिन्याच्या आत नवीन वकील नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करा असे आदेश विधी विभागाला दिले होते. पण एक वर्ष होऊन गेला तरीही विधी विभागाने ही प्रक्रिया सुरू केलेली नाही व मुदत संपलेल्या वकिलांना मुदतवाढ देऊन काम करून घेतले जात आहे, असा आरोप वेलणकर यांनी केला.

मुख्य विधी सल्लागार निशा चव्हाण म्हणाल्या, ‘महापालिकेच्या पॅनेलवर २६ वकील आहेत. त्यापैकी कोरोनापासून ४ ते ५ जण काम करत नाहीत. तसेच विधी विभागाने चुकीचे काही केले नाही. वकिलांच्या पॅनेलची निवड प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव आयुक्तांसमोर सादर केला आहे. त्यास मान्यता मिळाली की अर्ज मागवून नवे वकील पॅनेलवर घेतले जातील.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT